लोकपत न्यूज नेटवर्क / बीड
विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडविल्याबाबत करुणा शर्मा – मुंडे यांनी परळीच्या फौजदारी न्यायालयात ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून परळीच्या फौजरी न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. येत्या 24 फेब्रुवारी याबाबत परळीच्या फौजदारी न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांचं यामुळे टेन्शन वाढलं आहे. हे प्रकरण नक्की काय आहे, हे जाणून घेण्यासाठी ही बातमी सविस्तरपणे वाचा.
धनंजय मुंडे यांनी 2024 मध्ये विधानसभा लढविण्यासाठी उमेदवार अर्ज दाखल करताना या उमेदवारी अर्ज सोबतच्या शपथपत्रामध्ये पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुली तसंच करुणा मुंडे यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता. मात्र या शपथपत्रामध्ये करुणा मुंडे यांच्या मिळकतीचा कुठेही उल्लेख करण्यात आला नव्हता. धनंजय मुंडे यांनी खरी माहिती दडविल्याबाबत करुणा मुंडे यांनी बीड येथून परळीच्या फौजदारी न्यायालयात ऑनलाईन तक्रार अर्ज दाखल केला होता.
दरम्यान, मागील महिन्यात धनंजय मुंडे यांच्या विरोधात घरगुती हिंसाचाराबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने करुणा शर्मा – मुंडे यांना धनंजय मुंडे यांनी दोन लाख रुपये पुढे देण्याचा आदेश दिला आहे. त्यानंतर करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे विरोधात परळीच्या फौजदारी न्यायालयात ऑनलाईन तक्रार दाखल केल्यामुळे धनंजय मुंडे यांना कारणे दाखव नोटीस देण्याचा आदेश फौजदारी न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणाचा धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदावर आणि आमदारकीवर काय परिणाम होतो, हे पाहणं मोठ लक्षवेधी ठरणार आहे.