लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
मध्यप्रदेश इथून अहिल्या नगर जिल्ह्यातल्या शेवगाव इथं गांजा व्रिकीसाठी आणणाऱ्या 2 आरोपींना अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केलंय. या आरोपींकडून 29 लाख 64 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अहिल्यानगरचे एसपी राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली.
राकेश ओला (जिल्हा पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर) यांनी जिल्ह्यातल्या अवैध धंद्याची माहिती काढुन त्यांचेविरुध्द कारवाई करणेबाबत पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आदेश दिलेले आहेत.
नमुद आदेशान्वये पो. नि. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि तपास पथकातील पोसई/तुषार धाकराव व पोलीस अंमलदार गणेश लोंढे, बिरप्पा करमल, संतोष खैरे, विशाल तनपुरे व शिवाजी ढाकणे अशांचे पथक नेमूण जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करणेबाबत सूचना आणि मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
दि. 05/03/2025 रोजी हे पथक शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्दे करणा-या इसमांची माहिती काढत असताना पोसई/तुषार धाकराव यांना बातमीदारामार्फत इसम नामे बाबासाहेब धनाजी बडे (रा. हातगाव शिवार, ता. शेवगाव आणि अनिल बाबासाहेब बडे यांनी अंमली पदार्थ मोठया प्रमाणात दोन कारमधून विक्रीसाठी आणून तो त्यांचे घराशेजारील जनावराचे गोठयामधील खोलीमध्ये ठेवला असल्याची माहिती मिळाली.
या पथकाने मिळालेली माहिती पोनि/समाधान नागरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग यांना दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच शेवगाव पोलीस स्टेशनचे पोनि/समाधान नागरे, सपोनि/अशोक काटे, पोसई/महाले व पोलीस अंमलदार कृष्णा मोरे, अर्जुन मुंढे, आदिनाथ शिरसाठ, मारोती पाखरे, किशोर काळे, पाथरकर, संभाजी धायतडक व पांडुरंग मनाळ अशांचे संयुक्त पथक तयार केले.
पथक पंच आणि आवश्यक साधनांसह बातमीतील बोधेगाव ते हातगाव जाणाऱ्या रोडवर बाबासाहेब धनाजी बडे (रा. हातगाव, ता. शेवगाव) याच्या घरी जाऊन जनावरांच्या गोठयात जाऊन खात्री केली असता गोठयातील खोलीमध्ये दोन इसम मिळून आले. त्यांना पोलीस पथक व पंचाची ओळख सांगून त्यांना नाव विचारले असता त्यांनी त्यांची नाव 1) अनिल बाबासाहेब बडे, वय 34, रा. हातगाव, ता.शेवगाव, जि.अहिल्यानगर 2) बाबासाहेब धनाजी बडे, वय 70, रा.हातगाव, ता.शेवगाव, जि. अहिल्यानगर अशी असल्याचं सांगितलं.
पंचासमक्ष आरोपी, गोठयामधील खोली व घरासमोरील दोन कारची झडती घेतली घेऊन घटना ठिकाणावरून एकुण 29,64,200/- रूपये किंमतीचा मुद्देमाल त्यात 66.710 किलो वजनाचा अंमली पदार्थ, दोन मोबाईल, एक मारूती सुझुकी कंपनीची स्वीफ्ट कार क्रमांक एमएच-11-बीडी-5754 व एक मारूती सुझुकी कंपनीची इरटिगा क्रमांक एमएच-43-बीवाय-7784 असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ताब्यातील आरोपी अनिल बाबासाहेब बडे याच्याकडे जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्याने जप्त केलेला गांजा हा 3) मोतीराम पुर्ण नाव माहित नाही, रा.मध्यप्रदेश ( फरार ) याच्याकडून विक्रीकरीता आणला असून, आणलेला गांजा तो व त्याचे वडील बाबासाहेब धनाजी बडे असे मिळून स्थानिक परिसरामध्ये विकत असल्याची माहिती सांगितली.
नमूद आरोपी हे जप्त करण्यात आलेला अंमल पदार्थाचा मुद्देमाल विनापरवाना बेकायदा विक्री करण्याचे उद्देशाने बाळगताना मिळून आल्याने त्यांचेविरूध्द पोकॉ/1699 शिवाजी अशोक ढाकणे, नेम.स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शेवगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. 172/2025 एनडीपीएस ऍ़क्ट कलम 8 (क), 20 (ब) (ii) (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर, सुनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग यांच्या सुचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी संयुक्तपणे केली आहे.