Wednesday, January 22, 2025

मयत सरपंच संतोष देशमुख, त्यांचा भाऊ धनंजय देशमुख, पोलीस अधिकारी आणि आरोपींमध्ये काय झाली असेल चर्चा? मयत सरपंच देशमुख हत्याकांडातला ‘ट्विस्ट’ वाढला…!

लोकपत न्यूज नेटवर्क / बीड / प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यात असलेल्या मस्साजोग गावचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर 12 दिवस उलटून गेले आहेत. या हत्याकांडातला सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून घेतलेला दुसरा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत पीएसआय राजेश पाटील, आरोपी सुदर्शन घुले मयत सरपंच संतोष देशमुख

यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यात काहीतरी चर्चा सुरू असल्याचं दिसत आहे. या तिघांमध्ये नक्की काय चर्चा झाली असेल, असा प्रश्न अनेकांना पडलाय. एकूणच मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातला ‘ट्विस्ट’ वाढला आहे. या हत्याकांडाचा तपास करण्याचं पोलीस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभं ठाकलं आहे.

मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडासंदर्भातले सीसीटीव्ही कॅमेऱ्यातले दोन व्हिडिओ आतापर्यंत समोर आले आहेत. या दोन्ही व्हिडिओमध्ये अवघ्या चार मिनिटांचं अंतर आहे. त्यामुळे या प्रकरणातला गुंता आणखी वाढला आहे.

दरम्यान, आमदार रोहित पवार

यांनी मयत सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियांची नुकतीच भेट घेतली. ही घटना प्रचंड भितीदायक आणि संतापजनक अशी घटना आहे. ही घटना कोणालाच पटलेली नाही. या घटनेमागचा ‘मास्टर माईंड’ वाल्मिक कराड हा असून त्याला लवकरात लवकर अटक केली पाहिजे’, अशी प्रतिक्रिया आमदार पवार यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी