लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत तमाम मराठ्यांचा फार मोठा सहभाग राहिला आहे. दुर्दैवाने हल्ली मराठा हा शब्द जातीवाचक राहिला आहे. परंतू मराठा हा शब्द खूप व्यापक आहे. महार मागतील तांबोळी चांभार कुंभार आधी 18 पगड जातींना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. या सर्वच मराठ्यांचा स्वराज्याच्या या लढाईत सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यामुळे मराठ्यांचा समग्र इतिहास शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात हवा, अशी अपेक्षा आजच्या तरुणाईने व्यक्त केली आहे.
नेवासा तालुक्यातील सोनईजवळ असलेल्या हनुमान वाडी चौकात सिद्धिविनायक मंदिर असून या मंदिराच्या प्रांगणात काल (दि. २१) रात्री आठ वाजता सकल हिंदू परिवाराच्यावतीनं छावा चित्रपटाचे मोफत आयोजन करण्यात आलं होतं. शेकडो इतिहासप्रेमी ग्रामस्थांनी या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजांचा धगधगता इतिहास जाणून घेतला. या चित्रपटाच्या आयोजनासंदर्भात हा काही तरुणांनी सविस्तरपणे सांगितलं.
आम्ही तुमच्यासाठी खाली एक लिंक दिली आहे, अंगठ्याने ती दाबून धरा, opn हा शब्द येईल, त्यानंतर ती लिंक ओपन होईल. आणि हो, तुम्ही जर नवीन असाल तर तुमच्या हक्काच्या Lokpat YouTube channel लाख नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.
https://youtube.com/@youngindia-bm99?si=tqRFTHMSjfFsncgK