लोकपत न्यूज नेटवर्क / मुंबई / प्रतिनिधी
भारतातली सर्वात मोठी कार कंपनी सुझुकीने कारच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ह्युंदाई कंपनीने कारच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला होता. ही दरवाढ लाइन अप च्या सर्व किंमतीवर 4 टक्क्यांपर्यंत राहणार आहे. 1 जानेवारी 2025 पासून वाढलेले हे नवीन दर लागू होणार आहेत.
कालच्या शुक्रवारी अर्थात 6 डिसेंबर रोजी सुझुकी कंपनीने एका एक्सचेंज फायलिंगमध्ये ही माहिती दिलीय. दरम्यान एक दिवस आधी अर्थात गुरुवारी दिनांक 5 डिसेंबर रोजी ह्युंदाई कंपनीनेही नवीन वर्षापासून कारच्या सर्व मॉडेलच्या किमती 25 हजार रुपये वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
या दोन्ही भारतीय कार कंपन्यांव्यतिरिक्त मर्सिडीज – बेंझ बीएमडब्ल्यू आणि भारतात व्यवसाय करत असलेल्या ऑडी कंपनीनेदेखील कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे.
इनपुट कॉस्ट आणि लॉजिस्टिकमध्ये वाढ झाल्यामुळे या कंपन्यांनी कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे.