Wednesday, January 22, 2025

मल्टीस्टेटची बनवाबनवी भाग ७ ….! ‘हा’ घ्या पुरावा, ‘या’ मल्टीस्टेटच्या बनवाबनवीचा…!

‘मल्टीस्टेटची बनवाबनवी’ या वृत्तमालिकेचा आजचा (दि. १४)  ७ वा भाग अतिशय रंजक ठरणार आहे. योगायोगानं दिनांक १४ जानेवारीलाच या वृत्तमालिकेचा ७ वा भाग आला आहे. मल्टीस्टेटची स्थापना करून त्या मल्टीस्टेटच्या माध्यमातून गोरगरीब, भोळ्याभाबड्या ठेवीदारांनी ठेवलेल्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवींवर कशा पद्धतीनं संबंधित मल्टीस्टेटचा अध्यक्ष आणि त्याच्या नातेवाईकांनी संगममतानं डल्ला मारला, ठेवीदारांच्या पश्चात विविध बँकांमध्ये ठेवण्यात आलेली कोट्यवधी रुपयांची ९० % रक्कम रोख स्वरूपात काढून इतर ठिकाणी अर्थातच स्वतःच्या नावावर गुंतविण्याचं पाप केलंय, त्या मल्टीस्टेटचा अध्यक्ष आणि त्याच्या नातेवाईकांच्या पापाचा पाढा या वृत्तमालिकेच्या आजच्या ७ व्या भागात तुम्ही वाचणार आहात. त्यामुळे या वृत्तमालिकेतला प्रत्येक शब्द अन्  शब्द काळजीपूर्वक वाचा. 

 तब्बल 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवींचा आर्थिक घोटाळा करणाऱ्या भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटचा अध्यक्ष भारत पुंड याच्याविरुद्ध दि. १० सप्टेंबर २०२४ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या मल्टीस्टेटचं ‘फॉरेन्सिक ऑडिट’ करण्याच काम सध्या सुरू आहे. यामध्ये ठेवीदारांसाठी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ती वाचून प्रत्येक ठेवीदारांच्या तळपायाची आग 🔥 नक्कीच मस्तकापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही, हा आमचा दावा आहे. 

भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटचे ९९ टक्के संचालक हे एकाच कुटुंबातले आहेत. कदाचित या सर्वांनी ठेवीदारांच्या कोटी रुपयांवर ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारण्यासाठीच तर या मल्टीस्टेटची स्थापना केली नाही ना, अशी शंका गुंतवणूकदारांमधून सध्या व्यक्त केली जात आहे. याचं कारण असं आहे, की येस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, रुक्मिणी बँक या आणि अशा अन्य बँकांमध्ये भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट या नावानं बँक खातं उघडण्यात आलेलं आहे.

धक्कादायक बाब अशी, की या बँक खात्यातून भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटचा अध्यक्ष भारत पुंड, त्याचे नातेवाईक असलेले उपाध्यक्ष आणि अन्य संचालकांनी आम्ही वर उल्लेख केलेल्या या बँकांमधून ९० टक्के रक्कम रोख स्वरूपात काढून ती इतर ठिकाणी गुंतविली असून त्या रकमेवर प्रचंड नफा भारत पुंड आणि त्याच्या नातेवाईकांनी कमविलेला आहे, असा आरोप केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.

सुजान आणि सूज्ञ ठेवीदारांनो, या वृत्तमालिकेच्या मागच्या म्हणजे सहाव्या  भागात आम्ही तुम्हाला एक वचन दिलं होतं, की देशभरातल्या सर्वच मल्टीस्टेटवर नियंत्रण असलेल्या केंद्रीय सहकार निबंधक कार्यालयाचा पत्ता आम्ही तुम्हाला देणार होतो. त्या वचनाला आम्ही जागलो आहोत. नवीदिल्लीतल्या त्या कार्यालयाचा पत्ता आम्ही तुम्हाला खाली दिलेला आहे. ज्यांची ज्यांची विविध प्रकारच्या मल्टीस्टेटमध्ये आर्थिक फसवणूक झाली आहे, त्या सर्वांनी आम्ही खाली दिलेल्या नवीदिल्लीतल्या केंद्रीय सहकार निबंधक कार्यालयाच्या पत्त्यावर मराठीतून पत्रव्यवहार करावा, असा आग्रह धरत तूर्तास इथंच थांबत आहोत. धन्यवाद. 

Shri Vijay Kumar,IAS
Additional Secretary & Central Registrar of Cooperative Societies
Ministry of Cooperation,
Floor-I, Atal Akshay Urja Bhawan,
Lodhi Road, CGO Complex,
New Delhi PIN 110 003
(Landmark : Jawaharlal Nehru Statdium)

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी