सूज्ञ आणि सुजाण ठेवीदारांनो, ‘मल्टीस्टेटची बनवाबनवी’ या वृत्त मालिकेच्या आठव्या भागात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मल्टीस्टेटचे हेल्थ आणि हॉस्पिटल असे 1 हजार 558 वेगवेगळे प्रकार आहेत. हॉस्पिटल्स लायसन घेऊनही अनेक मल्टीस्टेट तुमच्या आमच्या सारख्या भोळ्याभाबड्या नागरिकांकडून टीव्ही गोळा करत आहेत. तुम्हाला वाचून धक्का बसेल पण हे वास्तव आहे, की 25 ते 50 लाख रुपये घेऊन मल्टीस्टेटच्या शाखा विकल्या जात आहेत. अर्थात मल्टीस्टेटच्या शाखा विकण्याचा हा गोरखधंदा मोजक्याच लोकांमध्ये सुरू असला तरी यासाठी तुमच्यासारख्या ठेवीदारांना मात्र अजिबात विचारात घेतलं जात नाही.
केंद्रीय सहकार उपनिबंधक कार्यालयाच्या मार्फत बहुराज्यीय कायदा 2002 नुसार या मल्टीस्टेट संस्थांना लायसेन्स दिलं जातं. महाराष्ट्रात या मल्टीस्टेट संस्था 534 आहेत. तर त्या खालोखाल नवीदिल्ली 169, उत्तरप्रदेश 163, तामिळनाडू 131, आणि गुजरातमध्ये फक्त 49 मल्टीस्टेट संस्था कार्यरत आहेत. महाराष्ट्रात मल्टीस्टेटच्या तब्बल 800 लायसेन्सचं वाटप करण्यात आल्याची माहिती आहे.
साधारणपणे हॉस्पिटल, मल्टीपर्पज आणि इतर प्रकारचे लायसेन्स या मल्टीस्टेटसाठी दिले जातात. या मल्टीस्टेट क्रेडिट सोसायट्या म्हणूनही ओळखल्या जातात. बँकेला मल्टीस्टेटचा जो दर्जा दिला जातो, तो मल्टीस्टेट शेड्युल बँक असा दिला जातो. नगर अर्बन बँकेला तो दर्जा देण्यात आला असून ती बँक नुकत्याच काही महिन्यांपूर्वी अवसायानात निघाली आहे.
फेडरेशन 10, कन्स्ट्रक्शन 9, वेल्फेअर 21, सीड 1, एक्सपोर्ट 1, कंजूमर म्हणजे ग्राहक मल्टीस्टेट 12, हाउसिंग 145, मल्टीपर्पज 103, हेल्थ किंवा हॉस्पिटल 21, डेअरी 97, फिशर्स म्हणजे मत्स्यपालन व्यवसाय करणाऱ्या मल्टीस्टेट 12, ऑरगॅनिक 1 इंडस्ट्रियल किंवा टेक्स्टाईल 1, ट्रान्सपोर्ट 1, मार्केटिंग 36, लेबर 1, टुरिझम 9, ॲग्रो 294, नॅशनल फेडरेशन 21 आणि इतर मल्टीस्टेट 39 असे हे प्रकार आहेत. तूर्तास इथंच थांबत आहोत, धन्यवाद.