Thursday, January 23, 2025

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब! अहिल्यानगरच्या ‘सिटी सर्वे’चा ‘आका’ शोधून काढाच…! या कार्यालयातलं सीसीटीव्ही फुटेज चेक करण्याचे आदेश द्या …! इथल्या अधिकाऱ्यांचे सी.डी.आर. एकदा तपासाच…!

लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर 

अहिल्यानगर शहरातल्या भूमी अभिलेख कार्यालयात (सिटी सर्वे) गेल्या अनेक वर्षांपासून ज्या काही आर्थिक ‘गडबडी’ सुरु आहेत आणि त्यातून सर्वसामान्य शेतकरी, उद्योजक, बिल्डर्स यांची आर्थिक लूट होत आहे, त्या संदर्भात राज्य शासनानेच या आता कुठं तरी खमकी भूमिका घेण्याची गरज आहे. अहिल्यानगर सिटी सर्वे या कार्यालयातल्या मोजणी अधिकारी आणि एजंटांच्या अभद्र युतीमुळे सर्वसामान्य माणूस प्रचंड वैतागला आहे. अक्षरशः तोंड दाबून बुक्क्यांचा मार संबंधितांना सहन करावा लागत आहे. 

या कार्यालयात सातत्याने तीच तीच माणसं ये – जा करताना दिसताहेत. दररोज विशिष्ट माणसंच या कार्यालयात का आणि कशासाठी येतात? या विशिष्ट माणसांच्या नावावर अशा किती एकर जमिनी आहेत? दररोज अहिल्यानगर सिटी सर्वेच्या कार्यालयात येणाऱ्या विशिष्ट माणसांचं आणि या कार्यालयातल्या मोजणी अधिकारी तसेच इतर अधिकाऱ्यांचे नक्की काय लागेबांधे आहेत, याचा शोध घेण्याची गरज आहे. त्यामुळेच आम्ही असं जाहीर आवाहन करत आहोत, की महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, अहिल्यानगरच्या ‘सिटी सर्वे’चा ‘आका’ शोधून काढाच. या कार्यालयातलं सीसीटीव्ही फुटेज चेक करण्याचे आदेश द्या. इथल्या अधिकाऱ्यांचे सी.डी.आर. एकदा तपासाच.

जिथं धूर निघतो, तिथं नक्कीच आग लागलेली असते, हे सर्वांनाच पटणारं ‘लॉजिक’ आहे. ज्या अर्थी अहिल्यानगर सिटी सर्वे कार्यालयातल्या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबद्दल सर्वसामान्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते, त्या अर्थी यामध्ये कुठं तरी तथ्य आहे. या कार्यालयाच्या परिसरात फेरफटका मारला असता दररोज चार ते पाच जण असे सहज सापडतात, की ज्यांची या कार्यालयातल्या अधिकाऱ्यांनी प्रचंड आर्थिक लूट केली आहे. त्यामुळे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुप्त पद्धतीने या कार्यालयातल्या ‘गडबडी’चा मागोवा घ्यावा आणि संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा जनसामान्यांमधून व्यक्त केली जात आहे. 

अविनाश मिसाळ साहेब! माणसांवर माणसं घालणं बंद करा…! 

जेव्हापासून ‘लोकपत’ न्यूज नेटवर्कने अहिल्यानगरच्या सिटी सर्वे कार्यालयातल्या आर्थिक ‘गडबडीं’वर बातम्या करायला सुरुवात केली आहे, तेव्हापासून या कार्यालयात चलबिचल सुरु झाली आहे. या बातम्या येऊ नये, यासाठी काय करता येईल, याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. मात्र सर्वसामान्य माणूस तक्रार करायला घाबरत असला तरी प्रसार माध्यम म्हणून ‘लोकपत’ मूग गिळून गप्प बसू शकत नाही. ‘क्लासमेट’च्या माध्यमातून आम्हाला हस्ते पर हस्ते ‘निरोप’ येत आहेत. मात्र अशा ‘निरोपां’ना आम्ही फारसं महत्त्व देत नाही. एकच सांगतो आहोत, अविनाश मिसाळ साहेब, माणसांवर माणसं घालणं बंद करा आणि आजूबाजूला ज्या काही गडबडी सुरु आहेत, त्या गडबडी करणाऱ्यांवर करडी नजर ठेवा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांनी त्यांच्या सरदारांना ‘शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावू नका’, असे सक्त आदेश दिले होते. इथं मात्र भाजीच काय,  पण शेतकऱ्यांची संपूर्ण जमीनच गिळंकृत करण्याचं कटकारस्थान सुरु आहे. 

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी