Sunday, April 27, 2025

महसूल पथकावर हल्ला करणारे दोघे जेरबंद ; अहिल्यानगर एलसीबीची धडाकेबाज कारवाई…!

लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर

संगमनेर तालुक्यात अवैध वाळू उत्खनन प्रतिबंध करण्याकरीता तहसीलदार धीरज मांजरे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाचं तयार करण्यात आल होतं. हे महसूल पथक दिनांक 09/02/2025 रोजी प्रवरा नदी पात्रात कनोली येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलं असता विशाल आबाजी खेमकर आणि प्रविण शिवाजी गवारी असे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन जात होते. त्यावेळी त्याच्या साथीदाराने अंधाराचा फायदा घेऊन जेसीबी घेऊन पळून जात असताना पथकाने पाठलाग केला असता जेसीबी ड्रायव्हरने पथकातील कर्मचाऱ्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जेसीबी अंगावर घातला.

आरोपींच्या इतर 5 ते 6 साथीदारांनी महसूल पथकास अडवून कारवाई केली तर जीवे मारण्याची धमकी दिली आणि महसूल पथकाच्या ताब्यातील जेसीबी घेऊन पळून गेले. याबाबत संगमनेर तालुका पोलीस स्टेशन गुरनं 64/2025 बीएनएस कलम 109, 132, 189 (2), 191 (2), 303 (2), 352, 351 (2)(3), 351 (4), 221 वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

राकेश ओला, पोलीस अधिक्षक अहिल्यानगर यांना अवैध वाळू उत्खननावर कारवाईसाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर वाळू तस्करांकडून झालेल्या हल्ल्यांची प्राथमिक माहिती मिळताच त्यांनी पोनि दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना नमूद गुन्हयांतील आरोपीचा शोध घेऊन कारवाई करणेबाबत आदेशित केले होते.

त्यानुषंगाने पोनि आहेर यांनी तपास पथकातील पोसई/अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, संदीप दरंदले, सागर ससाणे, अमृत आढाव, फुरकान शेख, मेघराज कोल्हे आणि महादेव भांड अशांचे पथक तयार करुन गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.

दिनांक 11/02/2025 रोजी पथक संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हयातील पाहिजे आरोपीचा तांत्रीक विश्लेषणाचे आधारे तपास करत असताना गुन्हयातील आरोपी नामे विशाल हौसीराम खेमनर, रा.अंभोरे, ता.संगमनेर हा त्याचे साथीदारासह संगमनेर शहरामध्ये असल्याची माहिती मिळाली. पथकाने संगमनेर शहरामध्ये आरोपीचा शोध घेऊन ते मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) विशाल हौसीराम खेमनर, वय 33, रा.अंभोरे, ता.संगमनेर 2) सागर गोरक्षनाथ जगताप, रा.कनोली, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले.

ताब्यातील आरोपीतांना विश्वासात घेऊन गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस करता त्यांनी सदरचा गुन्हा 3) सोनु मोर पुर्ण नाव माहित नाही रा. डिग्रस, ता.संगमनेर 4) तुषार हौसीराम खेमनर, रा.अंभोरे, ता.संगमनेर 5) लखन मदने, रा.आश्वी, ता.संगमनेर 6) फिरोज शेख, रा.अंभोरे, ता.संगमनेर 7) ताहीर शेख, रा.अंभोरे, ता.संगमनेर अशांनी मिळून केल्याची माहिती सांगीतली.तसेच गुन्हयातील वाहन व मुद्देमालाबाबत उपयुक्त माहिती सांगीतली नाही.
ताब्यातील वर नमूद दोन आरोपींना संगमनेर तालुका पोलीस स्टेशन गुरनं 64/2025 या गुन्हयाचे तपासकामी संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर, कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर उपविभाग यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी