लोकपत न्यूज नेटवर्क / नवीदिल्ली
भारतातल्या प्रयागराज या पवित्र ठिकाणी महा कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. देशातले कोट्यवधी भाविक त्याठिकाणी स्नान करण्यासाठी गेले आहेत. मात्र प्रत्येकालाच हे शक्य होत नाही. त्यामुळे महाकुंभमेळ्यात आपण स्नान करत असल्याचं स्वप्न एखाद्याला पडलं असेल तर ते स्वप्न शुभ असतं की अशुभ असतं, याचे उत्तर आपण या लेखात आज जाणून घेणार आहोत.
महाकुंभमेळा हे सनातन धर्मातलं खूप पवित्र असं पर्व आहे. प्रयागराज इथं जाऊन पवित्र अशा नद्यांमध्ये स्नान करणं, हे भाग्य निवडक लोकांच्याच नशीब असतं. मात्र आपण महाकुंभमेळ्यात स्नान करत असल्याचे स्वप्न पाहणं, हे नक्की कशाचं प्रतीक आहे, असा प्रश्न तुमच्या मनाला पडला असेल. तर त्या प्रश्नाचे उत्तर असं आहे, झोपेत अशी स्वप्नं पडणाऱ्या व्यक्तीचा आध्यात्मिक विकास नक्की होणार आहे.
महाकुंभमेळ्यात स्नान करत असल्याचं स्वप्न त्याला पडतं, त्याचं मन पवित्रतेकडे जात असल्याचं हे शुभ चिन्ह आहे. यामुळे मानसिक शांती मिळण्याची शक्यता जास्त असते. तुमच्या जीवनात ज्या गोष्टी तणावपूर्ण होत्या, त्या गोष्टी आता संपल्या, असाच या स्वप्नांचा अर्थ सांगितलेला आहे. महाकुंभमेळ्यात स्नान करीत असल्याचं स्वप्न जरी तुम्हाला पडलं नाही, तरी तुम्ही प्रयागराजमधल्या एखाद्या घाटावर उभे आहात, असं तरी स्वप्न तुम्हाला पडलं तरी तुमच्या आयुष्यात फार मोठे सकारात्मक बदल घडणार असल्याचं ते चिन्ह आहे.