Thursday, January 23, 2025

महाराष्ट्रात हे कसले हलकट चाळे…? बापानेच केले पोटच्या मुलीवर अत्याचार …!

लोकपत न्यूज नेटवर्क / मुंबई / प्रतिनिधी 

महाराष्ट्रात पोलीस यंत्रणा आणि कायद्याचा धाक राहिला नाही का, थोर संत महंतांच्या विचारांचा सकारात्मक परिणाम महाराष्ट्रातल्या सर्वच नाही मात्र मोजक्या लोकांवर होत नाही का, महाराष्ट्रातल्या काहींच्या डोक्यावर परिणाम झालाय का, या राज्यातले काही पुरुष पिसाळले आहेत का, महाराष्ट्रात हे कसले हलकट चाळे सुरू आहेत, असे एक ना अनेक प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडले आहेत. हे प्रश्न पडण्याचे कारण एवढेच, की रोज कुठे ना कुठे तरी महिला अत्याचाराच्या घटना घडल्याचं ऐकिवात येतं. मुंबईत तर एका नाराधम बापाने पुढच्या मुलीवरच अत्याचार केले. विशेष म्हणजे त्या मुलीचं वय अवघे तीन वर्ष आहे.

माणुसकीला कलंक असलेल्या या नराधम बापाला न्यायालयाने केवळ फाशीचीच शिक्षा द्यावी, अशी अपेक्षा यानिमित्ताने केली जात आहे. अल्पवयीन मुलगी घरात एकटीच होती बापाने तिच्याशी अश्लील चाळे सुरू केले आणि नंतर तिच्यावर अत्याचार केले. त्या मुलीच्या आईने याचा जाब विचारला असता नराधम बापाने शिवीगाळ करत मुलीच्या आईला जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

हे सारं सहन न झाल्यामुळे सदर अल्पवयीन मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी नराधम अत्याचारी बापाला अटक केली आहे. माणसांची नीतिमत्ता इतकी का आणि कशामुळे खालावली, कायदा आणि पोलिसांचा धाक या लोकांमध्ये राहिला नाही का, असे प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत. खरं तर अशा अत्याचारी लोकांना भरचौकात संतप्त जनसमुदायाकडून ठेचून मारल्याच्या शिक्षेची आपल्या कायद्यात तरतूद हवी आहे. तरच महाराष्ट्रात असले हलकट चाळे बंद होतील. 

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी