Saturday, April 26, 2025

माजी मंत्र्याच्या ‘दिवट्या’चे प्रताप…! सामान्यांचा बिनधास्त खिसा काप…! एवढी तत्परता नगरच्या ‘सिव्हिल हॉस्पिटल’च्या जळीतकांडात दाखवली असती तर हाताला काय साप डसला असता का?

लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर

माजी मंत्र्याचा ‘दिवटा’ रुसून चक्क ‘बँकॉक’ला गेला. आता तो ‘ति’कडे का आणि कोणत्या कामासाठी गेला होता, हे न कळण्याइतकी या राज्यातली जनता नक्कीच मूर्ख नाही. हा ‘दिवटा’ आधी दुबईलाही गेला होता म्हणे. पण बापाचं काळीज बघा, किती हळवं (?) असतं, पोरगं नक्की बँकॉकलाच गेलं, याची पक्की खात्री असलेल्या बापाने सत्तेचा दुरुपयोग करत संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लावली.

हेच मंत्री महोदय नगरला आरोग्य मंत्री होते, तेव्हा नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जळीतकांड झालं होतं आणि त्यामध्ये दहा रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. मात्र या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना नक्की किती मदत करण्यात आली, या जळीतकांडाच्या चौकशीत दोषी असलेल्या तत्कालीन सिव्हिल सर्जनला किती कठोर (?) शिक्षा करण्यात आली, याची अद्यापपर्यंत तरी कुठलीही माहिती अधिकृतपणे देण्यात आलेली नाही.

सत्तेचा सदुपयोग केला तर सामान्यांचे प्रश्न ताबडतोब सुटू शकतात. मात्र सामान्यांनी त्यांच्या समस्यांसाठी कायमच आपल्या घराचे उंबरठे झीजवावेत, सातत्यानं आपल्याला ‘साहेब’ ‘साहेब’ म्हणून विनवणी करावी, इतकी हलकट इच्छा असलेल्या काही राजकारणीं मंडळींमुळे अनेक वर्षे सामान्यांचे प्रश्न प्रलंबित राहतात. या पार्श्वभूमीवर एक प्रश्न सामान्य जनतेच्या मनात सातत्यानं डोकावतो आहे, तो म्हणजे एवढी तत्परता नगरच्या ‘सिव्हिल हॉस्पिटल’च्या जळीतकांडात दाखवली असती तर हाताला काय साप डसला असता का?

नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ज्यावेळी ही जळीतकांड घडलं होतं, त्यावेळी प्रचंड गदारोळ झाला होता. ज्यांच्या कुटुंबातले रुग्ण या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडले, त्या कुटुंबांची आर्त किंकाळी त्यावेळी आरोग्यमंत्री असलेल्या आजच्या माजी आमदाराच्या कानावर मात्र गेलीच नाहीत. ती जर गेली असती तर यामध्ये जे दोषी अधिकारी होते, त्यांच्यावर कठोर शासन झाला असता आणि मयत रुग्णांच्या कुटुंबीयांना भरपाई मिळत असती.

त्यावेळेस आरोग्य मंत्री आणि आता माजी असलेल्या आमदार महोदयांनी मुलाचा अपहरण झाल्याची खोटीच फिर्याद दिली. मुलगा आल्यानंतर मात्र पुन्हा सारवासारव केली. विशेष म्हणजे ज्या चार्टर्ड प्लेनने त्यांचा ‘दिवटा’ बँकॉककडे निघाला होता, त्या विमानाचा मार्ग देखील बदलविण्यात आला.

पोटच्या पोरासाठी एवढी तत्परता त्या वेळेचे आरोग्यमंत्र्यांनी दाखवली, याबद्दल आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही. मात्र अशी तत्परता नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेत का दाखवण्यात आली नाही, हेच नगरकरांना न सुटलेलं कोडं आहे. या माजी आमदाराच्या जिंदाबाद विजय असो, साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. अशा घोषण देत आहेत, त्या चमच्यांनी जरा भानावर येण्याची नितांत आवश्यकता आहे. तूर्तास इतकंच धन्यवाद.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी