Thursday, January 23, 2025

‘मास्टर माईंड’ वाल्मिक कराडला अटक करा : आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी…!

बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यात असलेल्या मस्साजोग या ग्रामपंचायतीचे तरुण, तडफदार सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. अक्षरशः राक्षसालाही लाज वाटेल, अशा पद्धतीने सरपंच देशमुख यांची हत्या करण्यात आल्यानंतर त्यांच्या मृतदेहाची अमानुषपणे विटंबना करण्यात आली. आठ दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या हत्येमागचा ‘मास्टरमाईंड’ वाल्मीक कराड

हाच असून त्याला अटक करा, अशी मागणी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली.

औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आमदार क्षीरसागर यांनी सरपंच संतोष देशमुख

यांच्या हत्येमागे कोण कोण आहे, आतापर्यंत किती आरोपींना अटक करण्यात आली आहे, अद्यापपर्यंत किती आरोपी अटकेशिवाय  उजळमाथ्याने फिरताहेत, या विषयाची सर्व माहिती आमदार क्षीरसागर यांनी सभागृहाला दिली. दरम्यान, या प्रकरणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही लोकसभेच्या सभागृहात आवाज उठवला. 

आमदार संदीप क्षीरसागर यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान…!

बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यात असलेल्या मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या हे प्रकरणात अतिशय गंभीर आहे. या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रचंड फज्जा उडाला असल्याचं आमदार क्षीरसागर यांनी सभागृहाच्या निदर्शनात आणून दिलं. यावेळी बोलताना आमदार क्षीरसागर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यांना एक आव्हान दिल. नक्षलवादी भागातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नक्षलवादी परिसरावर लक्ष केंद्रीत केलं होतं‌. त्याच पद्धतीनं मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीड जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करावं, असा आव्हान आमदार क्षीरसागर यांनी दिलंय. 

वाल्मिक कराड आणि सर्वच गुन्हेगारांचा सीडीआर तपासा…!

सरपंच संतोष देशमुख यांचा जो अत्यंत निर्पघृणपणे  खून करण्यात आला, त्यामागे नक्की काय कारणं आहेत, माणूस इतका क्रूर कसा काय होऊ शकतो, या हत्येशी आणखी कोणाकोणाचं ‘कनेक्शन’ आहे, हे सारं जनतेसमोर यायला हवं. त्यासाठी या हत्याकांडातला ‘मास्टरमाईंड’ वाल्मिक कराड आणि या हत्याकांडातले सर्वच गुन्हेगार या सर्वांचा एकमेकांशी झालेला फोन कॉल रेकॉर्ड म्हणजे सीडीआर तपासला तर सर्व वस्तुस्थिती जनतेसमोर येईल. त्यामुळे या सर्वांचा सीडीआर तपासा, अशी मागणी आमदार क्षीरसागर यांनी यावेळी अधिवेशनात केली आहे.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी