Wednesday, January 22, 2025

मी अद्यापही भाजपसोबतच : माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची ‘लोकपत’ला खास प्रतिक्रिया…!

लोकपत न्युज नेटवर्क / अहिल्यानगर

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या श्रेष्ठींनी अनेकवेळा विणवण्या करुनही ज्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या एबी फॉर्मसह विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला आणि तत्पूर्वी पक्षश्रेष्ठींवर नको ते आरोप केले, असे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे आपण अद्यापही भाजपसोबतच आहोत, असं सांगत आहेत. ‘लोकपत’ न्युज नेटवर्कनं माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्याशी त्यांच्या पुढील काळातल्या भुमिकेविषयी विचारणा केली असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे म्हणाले, ‘मी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केलेला नाही. फक्त त्या पक्षाच्या एबी फॉर्मसह उमेदवारी केली. दुर्दैवानं या निवडणुकीत मला पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र अद्यापही मी भाजपचाच आहे. भाजपच्या श्रेष्ठींशी लवकरच म्हणजे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यानंतर चर्चा करुन भाजपचे वरिष्ठ नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,

राधाकृष्ण विखे

हे जे सांगतील, त्यानुसार भाजपसोबत काम करण्याची माझी तयारी आहे.

दरम्यान, माजी आमदार मुरकुटे यांना भाजपसोबत राहण्याचा निर्णय तुम्ही विधानसभा निवडणुकीच्या काळातच का घेतला नाही, असं विचारलं असता ते म्हणाले, ‘त्यावेळची परिस्थिती माझ्या विरोधात होती. त्यामुळे त्याविषयी कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊ शकलो नाही. परंतु या पुढील काळात भाजपसोबत राहण्याचा आणि काम करण्याचा माझा विचार आहे.

मुरकुटेंना भाजप फक्त मतलबासाठीच हवाय : ऋषिकेश शेटे पाटील

भारतीय जनता पार्टीने एखाद्या कार्यकर्त्याची सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली तर पक्ष पुन्हा त्या व्यक्तीला स्विकारत नाही. माजी आमदार मुरकुटे यांनी भाजपकडून विधानसभेची उमेदवारी न मिळाल्यानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर कडवट टीका केली होती. फडणवीस यांनी धोका दिला तर विखे यांनी जाणीवपूर्वक उमेदवारी मिळू दिली नाही, असा आरोप मुरकुटे यांनी केला होता. मग आता भाजपश्रेष्ठी आणि कार्यकर्ते मुरकुटे यांना परत का आणि असं स्विकारतील? भाजप ही काही धर्मशाळा नव्हे. कधी या, कधीही जा, असं करायला. मुरकुटे यांनी आधीच भाजपच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे. त्यामुळे परत भाजपसोबत काम करण्याचं स्वप्न ते कशाच्या जोरावर पाहत आहेत, हेच मोठं कोडं आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील

यांनी व्यक्त केली आहे.

मुरकुटेंनी आता दिल्या घरीच सुखी रहावं : सचिन देसरडा

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे काहीही म्हणत असले तरी भाजपचे श्रेष्ठी आणि कार्यकर्ते त्यांना पुन्हा एकदा स्विकारणार नाहीत. कारण ज्यावेळी पक्षाला त्यांची गरज होती, त्यावेळी त्यांनी पक्षाचा, पक्षाच्या श्रेष्ठी आणि कार्यकर्त्यांचा कुठलाच विचार केला नाही. फक्त स्वतःचा स्वार्थ पाहिला. मात्र स्वार्थ साधला नाही म्हणून पुन्हा एकदा ते भाजपकडे येण्याची इच्छा व्यक्त करत असले तरी भाजपची संघटना त्यांना अजिबात स्वीकारणार नाही, अशी स्पष्ट प्रतिक्रिया भाजपचे तालूका समन्वयक सचिन देसरडा

यांनी व्यक्त केलीय. माजी आमदार मुरकुटे यांनी आता दिल्या घरीच सुखी राहावं. तमाम नेवासकरांचीदेखील हीच इच्छा आहे. विनाकारण पक्षात येऊन व्यर्थ लुडबूड करु नये, असंही देसरडा म्हणाले.

दरम्यान, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे एकीकडे मी अद्यापही भाजप सोबतचअसल्याचं सांगत असले तरी दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी राजीनामा पाठवला होता. ते पत्र मुद्दामहून ‘लोकपत’च्या वाचकांसाठी इथं देत आहोत. 

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी