लोकपत न्यूज नेटवर्क / पाथर्डी
बारावीच्या परीक्षेत पाथर्डी तालुक्यातल्या तनपुरवाडी परीक्षा केंद्रावर स्वतःच्या मुलाला कॉपी पुरविणाऱ्या निलंबित नायब तहसीलदाराविरुद्ध पाथर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. अनिल फक्कडराव तोरडमल
(निलंबित नायब तहसीलदार अहिल्यानगर, नेमणूक जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर) असं त्याचं नाव आहे.
याप्रकरणी शिवाजी अंबादास दळे, (वय 36 वर्षे, व्यवसाय – केंद्र संचालक केंद्र क्र. 0258, रा. येळी, ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर, मो.नं. 9689463201) यांनी फिर्याद दिली. पाथर्डी तालुक्यातल्या संत भगवान बाबा उच्च माध्यमिक विद्यालय तनपुरवाडी केंद्र (क्रमांक 0258) याठिकाणी निलंबित नायब तहसीलदार अनिल फक्कडराव तोरडमल हा संत भगवान बाबा उच्च माध्यमिक विद्यालय तनपुर वाडी केंद्र क्रमांक 0258 येथे त्याच्या मुलास कॉफी पुरवण्याच्या उद्देशाने अनाधिकृतरीत्या प्रवेश मिळवून त्यास कोणत्याही प्रकारचे शासकीय कर्तव्य नेमलेले नसताना परीक्षा केंद्रावर थांबून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करताना आढळून आला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
शिक्षणाचा धंदा करणाऱ्या ‘माफियां’चा बंदोबस्त होणार का?
पाथर्डी तालुक्यातल्या या परीक्षा केंद्रावर नगर भिंगारसह मुंबई पुणे या मोठमोठ्या शहरातले विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी येत असतात. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे अनेक अधिकारी आणि भरारी पथकातले अधिकारी सामील असल्याचे बोलले जात आहे. या लोकांसह काही पालकांनी या तालुक्यात शिक्षणाचा अक्षरशः धंदा केला आहे. अनेक क्षेत्रांत माफिया कार्यरत असताना या क्षेत्रातसुद्धा ‘माफिया’ सक्रिय आहेत. अशा ‘माफियां’चा बंदोबस्त होणार का, आज खरा प्रश्न आहे.
प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या बुद्धिमान विद्यार्थ्यांचं काय?
आई-वडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक विद्यार्थी रात्रंदिवस प्रामाणिकपणे अभ्यास करताहेत. बारावी हे वर्ष शैक्षणिक आयुष्यातलं खूप महत्त्वाचं आहे. कारण बारावीनंतरच पुढील महाविद्यालय शिक्षणाचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे दहावी आणि बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं असतं. बारावीच्या परीक्षेत जास्तीत जास्त मार्क मिळावेत, यासाठी विद्यार्थी आणि पालक प्रचंड कष्ट घेत असतात. प्रामाणिक आणि बुद्धिमान विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करत असताना या क्षेत्रातले ‘माफिया’ मुलांना कॉपी पुरवून उत्तीर्ण होण्यासाठी मदत करतात. अशा परिस्थितीत या प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या कष्टाचं मूल्य काय, याचा कोणीतरी विचार करणार आहे का?