Wednesday, May 14, 2025

यशवंतराव गडाख…! नेवाशाच्या क्षितिजावरचा उगवता सूर्य…!

बाळासाहेब शेटे पाटील

लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर

अहिल्यानगर जिल्ह्यातला नेवासा तालूका आणि त्या तालुक्यातल्या समाजकारण, राजकारण या क्षेत्रातलं अग्रगण्य असं नाव म्हणजे यशवंतराव गडाख…! उद्या अर्थात दिनांक 12 मे रोजी माजी खासदार यशवंतराव गडाख यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांच्या राजकीय आणि साहित्य क्षेत्रातल्या कामगिरीचा घेतलेला हा आढावा…!

अर्थात माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या कार्याचा आढावा या एकाच लेखात घेणं कदापि शक्य नाही. मात्र त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून (लोकपत डिजिटल मीडिया अहिल्यानगर) नं माजी खासदार गडाख

यांनी सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक, साहित्य आणि सहकार अशा विविध क्षेत्रांत केलेल्या प्रेरणादायी कार्याचा आढावा घेण्याच्या दृष्टीनं राज्यभरातल्या आमच्या (लोकपत डिजिटल मीडिया अहिल्यानगर) कोट्यवधी वाचकांसाठी हा लेख देण्याचा निर्णय घेतला आहे.

नेवासा तालुक्याच्या या भूमिपुत्राने विविध क्षेत्रांत या तालुक्याचा नावलौकिक वाढविला आहे. सुरुवातीला शिक्षकी पेशा करणारे आणि सोनई ते घोडेगाव असा सायकलवरुन प्रवास करणाऱ्या यशवंतराव गडाखांचं मन शैक्षणिक क्षेत्रात फारसं रमलं नाही. या क्षेत्राच्या व्यतिरिक्त अनेक क्षेत्र त्यांना खुणावत होती.

वैचारिक वारसा लाभलेल्या यशवंतराव गडाख यांनी मोठा लोकसंग्रह निर्माण केला आहे. युवक काँग्रेसचं अध्यक्षपद गडाखांकडे आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात त्यांनी युवकांची फळी उभी केली. जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषवित असताना त्यांच्या या लोकसंग्रहामध्ये मोठीच भर पडली. त्यानंतर आमदार आणि खासदार अशी राजकारणातली सर्वोच्च पदं गडाख यांनी भूषविली.

या पदांच्या माध्यमातून नेवासा तालुका भरभराटीकडे नेण्याचं काम त्यांनी केलं. शाळा, कला वाणिज्य आणि शास्त्र विभागाची महाविद्यालयं, कृषी महाविद्यालय आणि औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय अशी शिक्षणाची शृंखलाच त्यांनी या तालुक्यात तयार केली. मुळा कारखान्याच्या माध्यमातून हजारो कामगारांना रोजगार मिळवून दिला. शिक्षण क्षेत्रातदेखील अनेकांना नोकऱ्या दिल्या.

माजी खासदार यशवंतराव गडाख यांचं साहित्य क्षेत्रातदेखील फार मोठं योगदान आहे. 70 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवण्याचा प्रयत्न त्यांनी यशस्वी करुन दाखवला. प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे हे माजी खासदार यशवंतराव गडाखांचे समकालीन मित्र आहेत. साहित्य क्षेत्रात अशा अनेक मित्रांच्या सहकार्याच्या पाठबळावर माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी अर्धविराम, अंतर्वेध, माझे संचित, सहवास अशी उत्कृष्ट पुस्तकं प्रकाशित केली.

अशा या चतुरंगी किंबहुना बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी विविध क्षेत्रांमध्ये दमदारपणे केलेल्या वाटचालीचा थोडक्यात घेतलेला हा आढावा तुम्हाला कसा वाटला, याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. माजी खासदार यशवंतराव गडाख यांना वाढदिवसानिमित्त लोकपत डिजिटल मीडिया, अहिल्यानगर परिवाराच्यावतीनं निरोगी आणि प्रदीर्घ आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा…!

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी