लोकपत न्यूज नेटवर्क / तेलंगणा / प्रतिनिधी
जर्मन नागरिकत्व असतानादेखील चारवेळा आमदारकी भूषविणाऱ्या चेन्नमनेनी रमेश यांना तेलंगणा कोर्टाने चांगलाच हिसका दाखवला आहे. कोर्टाची दिशाभूल करून जर्मन नागरिकत्व लपवून ठेवल्याबद्दल माजी आमदार चेन्नमनेनी रमेश यांना 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय.
याचिकाकर्ते व्ही. रोहित आणि काँग्रेसचे आदी श्रीनिवास यांनी याचिकेत सांगितले की, १९९० साली चेन्नमनेनी रमेश जर्मनीत नोकरीसाठी गेले होते. तिथेच त्यांचे लग्न झाले आणि त्यांचे कुटुंबही तिथेच होते. त्यांच्याकडे नैसर्गिक जर्मन नागरिकत्व आहे. 2009 साली चेन्नमनेनी रमेश हे तेलंगणाच्या वेमुलवाडा येथून निवडून आले होते. तेव्हापासून त्यांनी चारवेळा याठिकाणाहून आमदारकी भूषविली.
चेन्नमनेनी रमेश यांनी भारतीय नागरिकत्व स्विकारल्यानंतरही जर्मन नागरिकत्व आणि पासपोर्ट कायम ठेवला होता.
चेन्नमनेनी रमेश यांच्याविषयीचा हा गोषवारा…!
संयुक्त आंध्रप्रदेश असताना 2009 मध्ये चेन्नमनेनी रमेश यांनी पहिल्यांदा वेमुलवाडा येथून निवडणूक जिंकली होती. त्यानंतर तेलंगणा हे राज्य वेगळं झालं. यानंतर चेन्नमनेनी रमेश यांनी 2010, 2014 आणि 2018 मध्ये या ठिकाणाहून निवडणूक जिंकली होती. 2013 साली त्यांच्या नागरिकत्वाचा वाद उपस्थित झाला, तेव्हा उच्च न्यायालयाने त्यांची आमदारकी रद्द केली होती. परंतू सर्वोच्च न्यायालयानं दिला होता. २०२३ साली त्यांचा पुन्हा निवडणुकीत विजय होताच, प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार आदी श्रीनिवास यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर आता दोन वर्षांनी उच्च न्यायालयानं निकाल सुनावलाय.