लोकपत न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था
रशियाच्या कझान शहरात आज सकाळी 9 / 11 सारखा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात निवासी इमारतींना लक्ष करण्यात आलं असून 9 ड्रोन हल्ले करण्यात आले आहेत. रशियाची राजधानी मॉस्कोपासून 800 किलोमीटर अंतरावर हा हल्ला झाला आहे. सुदैवाने या हल्ल्यामध्ये जीवितहानी झालेली नाही.
हल्ल्यानंतर रशियाचे दोन विमानतळ बंद करण्यात आले आहेत. अवघ्या दोन दिवसांपूर्वी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी युद्ध थांबवण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी ते बोलणार होते. दरम्यान, या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.