लोकपत न्यूज नेटवर्क / मुंबई / प्रतिनिधी
लाडक्या बहिणींचा सहावा हप्ता 1500 रुपये नुकताच जमा करण्यात आला. दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी किंबहुना विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यावेळचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्या वेळचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली होती, की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर यापुढे 2100 रुपये जमा होणार. पण मग ते 2100 रुपये नक्की कधीपासून म्हणजे कोणत्या महिन्यापासून मिळणार आहेत, याविषयी राज्यातल्या तमाम लाडक्या बहिणींमध्ये मोठी उत्सुकता व्यक्त केली जात आहे.
2 लाख 34 हजार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता जमा करण्यात आला आहे. 12 लाखांपेक्षा जास्त पात्र महिलांनी बँक खाती आधार लिंक केली आहेत. महायुती सरकारने राज्यातल्या महिलांना 2100 रुपये देण्याची घोषणा केली खरी. आर्थिक आघाडीवर ही रक्कम तातडीनं वाढवणं शक्य नाही. त्यामुळेच जानेवारी महिन्यातदेखील 2100 लाडक्या बहिणींना मिळणं काहीसं कठीण आहे.
मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्राचा अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. या अर्थसंकल्पानंतर कदाचित 2100 रुपये लाडक्या बहिणींना देण्याची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून लाडक्या बहिणींसाठीचा 2100 रुपये हप्ता त्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे.