लोकपत न्यूज नेटवर्क / मुंबई
राज्याच्या प्रशासकीय आणि स्थानिक विकासाच्या दृष्टिकोनातून 21 जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. येत्या प्रजासत्ताकदिनी (दि. २६) या संदर्भातली घोषणा होण्याची शक्यता आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या 35 जिल्ह्यांपैकी अनेक जिल्ह्याचं विभाजन करून नवीन जिल्हे तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रशासन अधिक सुलभ होईल आणि स्थानिक विकासाची प्रक्रिया गतिमान होईल. या प्रक्रियेमध्ये अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्याचं विभाजन होणार आहे.
अशी आहे नवीन जिल्ह्याची प्रस्तावित यादी आणि असं आहे मूळ जिल्ह्यांचे विभाजन…!
भुसावळ (जळगाव)
उदगीर (लातूर)
आंबेजोगाई (बीड)
मालेगाव (नाशिक)
कळवण (नाशिक)
किनवट (नांदेड)
मीरा – (भाईंदर ठाणे)
माणदेश (सांगली सातारा कोल्हापूर)
खामगाव (बुलढाणा)
बारामती (पुणे)
पुसद (यवतमाळ)
जव्हार (पालघर)
अचलपूर (अमरावती)
साकोली (भंडारा)
मंडणगड (रत्नागिरी)
महाड (रायगड)
शिर्डी (अहिल्यानगर / अहमदनगर)
संगमनेर (अहिल्यानगर / अहमदनगर)
श्रीरामपूर (अहिल्यानगर / अहमदनगर)
अहेरी (गडचिरोली)
ज्यावेळी दिनांक 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, त्यावेळी महाराष्ट्रात फक्त 25 जिल्हे अस्तित्वात होते. कालांतराने जिल्ह्यांची संख्या वाढत गेली. 2024 मध्ये ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. जिल्हा विभाजनानंतर प्रत्येक जिल्ह्याचा आकार कमी झाल्यामुळे प्रशासन अधिक चपळ आणि सक्षम होईल. स्थानिक पातळीवर समस्या सोडवण्यास याची मदत होईल.
नवीन जिल्ह्याच्या निर्मितीमुळे प्रत्येक विभागातल्या नागरी समस्या जलद गतीने सोडवल्या जातील. दरम्यान, नवीन जिल्ह्यांची निर्मिती विकासासाठी आवश्यक असले तरी यासाठी प्रचंड आर्थिक गुंतवणूक आणि प्रशासकीय पुनर्रचना करावी लागते. नवीन जिल्ह्याचे मुख्यालय, सरकारी कार्यालये, पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पाडुळाची आवश्यकता पडते. त्यामुळे जिल्ह्याची विभाजन प्रक्रिया मोठी गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक आहे. 26 जानेवारी रोजी या संदर्भात खरंच घोषणा होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.