लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
अहिल्यानगर शहरालगतच्या वडारवाडी ग्रामपंचायत हद्दीत असलेले भूखंड दुसऱ्याच व्यक्तींच्या नावावर लावण्यात आलेले आहेत. या ग्रामपंचायतीला एक तर गावठाण नाही. या ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा नसल्यामुळे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या कचऱ्याचा मोठा भीषण प्रश्न उपस्थित झाला आहे. अशातच वडारवाडी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक, तलाठी, मंडलाधिकारी अशा जबाबदार अधिकाऱ्यांनी भूखंडाचं श्रीखंड खाल्लं असल्याचा आरोप या ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच कैलास पगारे यांनी केला आहे. या संदर्भात ऐन प्रजासत्ताकदिनी उपसरपंच पगारे जिल्हाधिकारी कार्यालसमोर अमर उपोषण करणार आहेत.
या संदर्भात माजी उपसरपंच पगारे यांनी सांगितलं, की गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. वडारवाडी ग्रामपंचायत हद्दीत असलेले भूखंड दुसऱ्याच्या नावावर करण्यामागे ग्रामसेवक, तलाठी, मंडलाधिकारी या जबाबदार अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार करण्याचा विचार आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा. असं न झाल्यास नाविलाजास्तव अमोल उपोषणाचा मार्ग पत्करावा लागेल.