लोकपत न्यूज नेटवर्क / मुंबई / प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यात असलेल्या मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातला ‘मास्टरमाईंड’ अशी ओळख असलेल्या वाल्मीक कराडला नुकतीच अटक करण्यात आली आहे. सीआयडीच्या पथकाने पुण्यातून कराडला अटक केल्याची माहिती येत आहे.
दरम्यान, वाल्मीक कराड याच्यासह फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्यात येत आहे. कराड याच्या नातेवाईकांचीदेखील बँक खाती गोठविण्यात आली असून कराड याचीही बँक खाती गोठविण्यात आली आहेत. सुदर्शन घुले कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघेजण अद्यापही फरार आहेत.
प्रतीक घुले, जयराम चाटे, महेश केदार आणि विष्णू चाटे यांना यापूर्वीच पोलिसांनी अटक केलेली आहे. वाल्मीक कराडविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्याला कोणत्या गुन्ह्यात अटक करण्यात आली, याविषयी सर्वत्र उत्सुकता आहे.
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क मोबाईल नंबर
70 28 35 17 47