लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्याच्या मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण आणि अमानुष हत्येच्या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हादरुन गेला आहे. या हत्याकांडामागचा ‘मास्टरमाईंड’ वाल्मीक कराड यांनाच म्हटलं जात आहे. दुर्दैवानं कराड अजूनही फरारच आहेत. त्यामुळे या घटनेचं गांभीर्य आणखी वाढलं आहे.
सीआयडी विभागानं याप्रकरणी आतापर्यंत 115 जणांची चौकशी केली आहे. त्यामध्ये काही महिला पदाधिकाऱ्यांचासुद्धा समावेश आहे. मात्र जोपर्यंत वाल्मीक कराड पोलिसांच्या हाती लागत नाही, तोपर्यंत या घटनेचे गांभीर्य किंवा या घटनेविषयीची उत्सुकता आणखी ताणली जाणार आहेत. दरम्यान, सीआयडी विभागानं कराड यांच्याभोवती भक्कम असा फास आवळला आहे.
दुसरीकडे अशीही चर्चा आहे, की वाल्मीक कराड लवकरच पोलिसांना शरण येणार आहे. अद्यापतरी तशी परिस्थिती दिसत नसली तरी कराड विदेशात पळून जाणार नाहीत, याची सीआयडी पोलिसांनी अतिशय चोख व्यवस्था केली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण आणि अमानुष अशा हत्याकांडाच्या गंभीर घटनेवरुन राजकारण करणं योग्य नाही. मात्र यातही अनेक जण एकमेकांवर आरोप करत आहे. या पार्श्वभूमीवर लोकपत न्यूज नेटवर्क & लोकपत यूट्यूब चॅनलनं केलेले हे भाष्य तुम्हाला कसं वाटलं, याविषयी तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि हो, तुमच्या जर काही बातम्या आणि जाहिराती असतील तर त्या आम्हाला [email protected] या वेबसाईटवर नक्की पाठवा. तत्पूर्वी आमच्याशी 70 28 35 17 47 या व्हाट्सअप मोबाईलवर अवश्य संपर्क करा, धन्यवाद.