लोकपत न्यूज नेटवर्क / बीड
बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्याच्या मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला वाल्मीक कराड सध्या प्रचंड तणावात आहे. सीआयडी कडून त्याची कसून चौकशी सुरु आहे. कराड याला सध्या व्यवस्थित झोप येत नाही त्यामुळे त्याचे डोळे लालबुंद झाले आहेत.
दरम्यान, कराड याची डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली असून औषधोपचार केले आहेत. जास्त जागरण आणि तणावामुळे डोळे लाल होतात, अशी अपडेट डॉक्टरांनी दिली आहे. कराड याने विष्णू चाटेच्या फोनवरून पवनचक्की कंपनीचे अधिकाऱ्यांना खंडणी मागितल्याचा आरोप सध्या केला जात आहे. विशेष म्हणजे या संदर्भातले कॉल रेकॉर्डिंग सीआयडीच्या हाती लागलं आहे.
सुदैवानं न्यायसंहितेमध्ये अलीकडच्या काळात महत्त्वाचे बदल झाले असून हे कॉल रेकॉर्डिंग (सीडीआर) आणि त्यातल्या आवाजाची चाचणी झाल्यानंतर तो आवाज मिळताजुळता असला तर आरोपीविरुद्ध कठोर कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे कराड यांच्या अडचणींमध्ये प्रशांत वाढ होत असल्यास दिसून येत आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतले सात आरोपी आतापर्यंत अटकेत असून कृष्णा आंधळे अद्यापही फरारच पोलीस त्याचा शोध घेत आहेत.