Thursday, January 23, 2025

विमा प्रतिनिधींचे 17 डिसेंबरला सत्याग्रह आंदोलन…!

लोकपत न्युज नेटवर्क / पुणे / प्रतिनिधी

भारतीय आयुर्विमा महामंडळाने जुन्या सर्व योजना बंद केल्या असून मार्केटमध्ये विक्रीसाठी आणलेल्या नवीन योजनांमध्ये अनेक किचकट तरतुदी, काही संभाव्य तरतुदी, त्रुटी विमाप्रतिनिधींना अडचणीचे ठरत आहेत. नवीन तरतुदींमुळे योजना ग्राहकांना फायदेशीर आहे. ही चांगलीच बाब आहे. पण विमा प्रतिनिधींना मात्र त्या तरतुदी घातक आहेत.

याबाबत पुणे येथील भारतीय आयुर्विमा महामंडळालादेखील निवेदन देऊन घातक असलेल्या परिपत्रकाचा विरोध संपूर्ण देशभर विमा प्रतिनिधी करीत आहेत. त्या अनुषंगाने मंगळवार दिनांक 17 डिसेंबर रोजी पुणे येथे विभागीय कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन नगरचे विमा प्रतिनिधी करणार आहेत, अशी माहिती ऑल इंडिया लाइफ इन्शुरन्स एजंटस् फेडरेशन ऑफ इंडिया पुणे विभागाचे विभागीय संघटक सचिव प्रमोदकुमार छाजेड यांनी दिलीय.

याबाबत छाजेड यांनी नुकतेच पुणे विभागीय कार्यालयाला निवेदन दिले असून त्यामध्ये त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. ते म्हणाले, की
विमा प्रतिनिधी यांनी पॉलिसी विक्री केल्यानंतर जर ग्राहकांना काही अडचणींमुळे पुढील वर्षाचे हप्ते न भरल्यास व पॉलिसी सरेंडर केल्यास विमा प्रतिनिधीला दिलेले कमिशन पुन्हा वसुल करण्याची घातक तरतूद करण्याचा छुपा अजेंडा घेवून आयुर्विमा महामंडळ काम करत आहे, अशी आमची भावना झाली आहे.

या परिपत्रकात तसा स्पष्ट उल्लेख
जरी नसला तरी पड‌द्यामागून या हालचाली चालू असल्याच्या दिसून येत आहेत. आयुर्विमा महामंडळाच्या आजपर्यंत झालेल्या लौकिकामध्ये सर्वात मोठे योगदान असंख्य विमाप्रतिनिधी बंधूभगिनींनी दिलेले आहे.

नव्याने सुरु असलेल्या हालचाली पाहता आपल्या योजना ग्राहकांसाठी आकर्षक अशा चांगला बोनस देणा-या आयुर्विमा महामंडळाने विक्रीसाठी काढाव्यात व विमा प्रतिनिधींना एक आर्थिक स्थैर्य पेर्वीप्रमाणे प्राप्त होण्यासाठी कमिशन दरांमध्ये बदल न करता, तसेच दिलेले कमिशन वसुलीबाबत असे कुठलेही विमा प्रतिनिधीसाठी घातक असलेले निर्णय घेण्यात येवू नये.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी