लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर
अहिल्यानगर तालुक्यातल्या देहरे इथं सासरी राहत असताना मयत पूनमचा सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचं पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे. बंगल्याच्या फर्निचर आणि रंगकाम करण्यासाठी लागणाऱ्या तीन लाख रुपयांची सासरच्या मंडळींकडून तिच्याकडे सातत्याने मागणी केली जायची. अशातच तिचा मामेसासरा जालिंदर करांडे याची तिच्यावर वाईट नजर पडली. लज्जा उत्पन्न होईल, असं वर्तन तो तिच्याशी सातत्यानं करायचा. हे सहन न झाल्यामुळे पूनमनं
विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
मयत पूनमचा नवरा विशाल रावसाहेब लांडगे याला पोलिसांनी अटक केली असून मामे सासरा जालिंदर सयाजी करांडे, मामे सासू रोहिणी जालिंदर करांडे, सासू सुंदरबाई रावसाहेब करांडे हे अद्यापही उजळमाथ्यानं फिरत आहेत. एमआयडीसी पोलीस या आरोपींना पाठीशी का घालत आहेत? सर्वच आरोपींना पोलिसांनी आत्तापर्यंत अटक का केली नाही? यामध्ये कुठं तरी आर्थिक देवाणघेवाण तर झाली नाही? हे आणि अशा अनेक प्रकारचे प्रश्न मयत पूनमच्या नातेवाईकांमधून उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, मयत पूनमचा नवरा विशाल रावसाहेब लांडगे याला पोलिसांनी अटक केली असून मामे सासरा जालिंदर सयाजी करांडे, मामे सासू रोहिणी जालिंदर करांडे, सासू सुंदरबाई रावसाहेब करांडे हे अद्यापही उजळमाथ्यानं फिरत आहेत. एमआयडीसी पोलीस या आरोपींना पाठीशी का घालत आहेत? सर्वच आरोपींना पोलिसांनी आत्तापर्यंत अटक का केली नाही? यामध्ये कुठं तरी आर्थिक देवाणघेवाण तर झाली नाही? हे आणि अशा अनेक प्रकारचे प्रश्न मयत पूनमच्या नातेवाईकांमधून उपस्थित केले जात आहेत.