Monday, April 28, 2025

शंभू राजा सब पे भारी हैं…! ४० दिवस अनन्वित छळ ; तरीही स्वधर्मासाठी न झुकणारा ‘छावा’…!

लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर

‘हाथी, घोडे, तोफ, तलवारें फौज तो तेरी सारी हैं… पर जंजिर में जकडा राजा मेरा अब भी सब पे भारी हैं’…! साक्षात मृत्यू समोर ठाकला असतानादेखील सावलीप्रमाणे शंभूराजांची साथ देणारे कवी कलश हे छत्रपती संभाजी महाराजांच्या आदेशानुसार क्रूरकर्मा, पाताळयंत्री, नीच, कपटी अशा औरंग्याला हे अविस्मरणीय असं काव्य ऐकवत असल्याचं एक मनमोहक दृश्य ‘छावा’ चित्रपटात पहायला मिळतंय.

त्या क्रूरकर्मा, कपटी औरंग्यानंं शंभूराजांचा ४० दिवस अनन्वित छळ केला. पकडीनं हातांची नखं ओढून घेण्याचे आदेश दिले. तप्त अशा लोखंडी सळयांनी डोळे काढले. शंभूराजांची जीभ उपटून टाकण्यात आली. अंगावरची सारी साल सोलून काढण्यात आली. त्यावर जाडंभरडं मीठ रगडून चोळण्यात आलं. एवढा सारा अमानुष छळ करण्यात आला. तरीही स्वधर्मासाठी ‘मुगल सल्तनत’समोर न झुकणारा हा ‘छावा’ हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातला अढळ, अटळ आणि तितकाच कणखर असा हिमालय आहे.

‘छावा’ चित्रपटानं ‘बॉक्स ऑफिस’वर धुमाकूळ घातला, इतका गल्ला जमवला, या अभिनेत्यानं खूप छान काम केलं, चित्रपटाच्या शेवटी प्रेक्षक ढसढसा रडले, अशा बातम्या तुम्ही आतापर्यंत ऐकल्या आणि पाहिल्या असतील. या चित्रपटात शंभूराजाचा जो अनन्वित छळ करण्यात आल्याचं दाखवलं गेलंय, ते पाहून कोणत्याही सहृदयी माणसाला भावना अनावर होणं साहजिकच आहे.

2 तास 31 मिनिटे आणि 39 सेकंदांचा हा ‘छावा’ चित्रपट तुम्ही पाहिला नसेल तर आजपर्यंत तुम्ही काहीच पाहिलं नाही, असा त्याचा अर्थ होईल. सोयराबाई महाराणी साहेब, गणोजी आणि कान्होजी शिर्के यांच्या फंदफितुरीमुळे शंभूराजांच्या वाट्याला अनन्वित छळ आला. परंतू हसत हसत हा छळ शंभूराजांनी सहन केला. शंभूराजांचे डोळे काढल्यानंतर औरंग्या म्हणतो,

‘हमारी तरफ आ जा, हिंदू धर्म बदल दें, जिंदगी बदल जाएगी’.

या उलट युवराज छत्रपती संभाजीराजे हे औरंग्याला प्रतिआव्हान देत आहेत, हमारी तरफ आजा, जिंदगी बदल जाएगी, पर धर्म नहीं बदलना पडेगा’. अशी ही धर्मसंहिष्णुता फक्त आणि फक्त छत्रपती शंभूराजांच्याच विचारात पाहायला मिळतेय.

वास्तविक पाहता औरंग्याच्या विचारांनुसार छत्रपती शंभूराजांना हे सहज करता आलं असतं. परंतू आबासाहेब अर्थात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आदर्श शिकवण डोळ्यासमोर ठेवून शत्रूसमोर न झुकण्याचा मराठ्यांचा बाणा छत्रपती शंभूराजांनी दाखवून दिला. शंभूराजांच्या पाठीवर आणि स्वराज्याच्या छातीवर वार करणाऱ्यांच्या स्वार्थी प्रवृत्तीमुळे हिंदवी स्वराज्य संकटात आलं असलं तरी युवराज छत्रपती संभाजी राजेंचं बलिदान अजिबात व्यर्थ गेलं नाही. यांचं कारण असं, की एका प्रसंगात औरंग्या म्हणतो, ‘सिवा चला गया. लेकिन अपनी सोच जिंदा छोडकर चला गया’. तर औरंग्याची मुलगी म्हणते,

‘संभा अपनी ‘मौत का जश्न’ मना कर चला गया और हमे ‘मातम’ मनाने के लिए छोड गया’. यातच छत्रपती शिवरायांच्या आदर्श अशा शिकवणुकीचा विजय आहे.

पालकांनो! तुमच्या ‘दिवट्या’ला आणि मुलीला नक्की दाखवा बरं… छावा…!

जबाबदारीपासून लांब जात असलेल्या आणि व्यसनांच्या विळख्यात सापडलेल्या आजच्या दुर्दैवी ‘दिवट्या’ला तसंच प्रेमाच्या खोट्या आमिषाला बळी पडून चुकीचं पाऊल उचलणाऱ्या मुलींना खऱ्या अर्थानं छावा चित्रपट दाखवण्याची नितांत आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर तमाम पालकांना आम्ही असं जाहीर आवाहन करत आहोत, की तुम्ही स्वतः तर पहाच पण तुमच्या मुलामुलींनादेखील ‘छावा’ हा चित्रपट आवर्जून दाखवा. धन्यवाद.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी