लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर हे नेवासे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचं फार मोठे भूषण आहे. या देवस्थानच्या माध्यमातून राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात अहिल्यानगरचं नाव पोहोचलं आहे. मात्र या ठिकाणी पूजा साहित्य विक्री करणाऱ्या दुकानदारांसह एजंटांचा शनिभक्तांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
अशा परिस्थितीत पोलीस मुख्यालयातून अनेकवेळा शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात रुजू झालेला एक पोलीस कर्मचारी शनिभक्तांसाठी प्रचंड डोकेदुखी ठरत आहे. चौथऱ्यावर जाऊन शनी दर्शन घेण्याची अनेक भक्तांची इच्छा असते. मात्र या इच्छेचा हा पोलीस कर्मचारी मोठ्या प्रमाणात गैरफायदा घेत असल्याच्या तक्रारी आहेत.
या पोलीस कर्मचाऱ्याच्या मनमानीकडे शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे एपीआय टेंभेकर यांचंदेखील अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
एका बाजूला एजंटांची लुडबूड तर दुसऱ्या बाजूला या पोलीस कर्मचाऱ्यांची मनमानी शनिशिंगणापूरमध्ये दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्याचे एसपी राकेश ओला यांनी या पोलीस कर्मचाऱ्याची कानउघडणी करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांमधून केली जात आहे.