लोकपत न्यूज नेटवर्क / नेवासा
माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचे नातू कुणाल गौडा यांनी नुकतंच शनिशिंगणापूर येथे येऊन शनिदेवाचा मनोभावे दर्शन घेतलं आणि विधीवत अभिषेक केला. याप्रसंगी पोलीस पाटील ॲड. सयाराम बानकर यांच्या वतीने त्यांच्या सत्कार करण्यात आला.
शनिशिंगणापूर देवस्थान राबवित असलेल्या गोशाळा, रुग्णालय, अन्नदान या उपक्रमांसाठी कुणाल गौडा यांनी शनिशिंगणापूर देवस्थानला पाच लाखांची मदत केली.
यावेळी माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे खाजगी सचिव मंजुनाथ गौडा, वैष्णव प्रकाश, भाऊसाहेब बानकर, ऋषिकेश बानकर आदी उपस्थित होते.
सन 1999 मध्ये ज्यावेळी पण माजी पंतप्रधान देवेगौडा हे शनि दर्शनासाठी आले होते, तेव्हा शनिशिंगणापूर देवस्थानच्या निर्मितीसाठी अहोरात्र प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे, या देवस्थानचा कारभार पारदर्शीपणे करणारे, अतिशय शिस्तप्रिय असे माजी अध्यक्ष स्वर्गीय बाबुराव (भाऊ) बानकर यांनी सत्कार केल्याची आठवण कुणाल गौडा यांनी यावेळी बोलून दाखवली.