Monday, June 16, 2025

शनिशिंगणापूर देवस्थान बनावट ॲप घोटाळा : काही घोटाळे बहाद्दरांची नावं समोर आली? कोणाचीही गय केली जाणार नाही…! अहिल्यानगर ‘सायबर डिपार्टमेंट’ची भूमिका…!

बाळासाहेब शेटे पाटील 

लोकपत डिजिटल मीडिया /  अहिल्यानगर

जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानच्या सर्वच नाही, परंतू काही विश्वस्त आणि अधिकाऱ्यांचेच हात बनावट ॲप घोटाळ्यात अडकले असल्याचं समोर येत आहे. या घोटाळ्यात अहिल्यानगरच्या ‘सायबर डिपार्टमेंट’कडे काही घोटाळे बहाद्दरांची नावं आल्याची खात्रीलायक माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. या घोटाळ्यात ज्यांचा ज्यांचा संबंध आहे, त्यापैकी कोणाचीच गय केली जाणार नाही, अशी भूमिका या विभागाने घेतली असल्याचं एका अधिकाऱ्यानं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं. 

शनिशिंगणापूर देवस्थानअंतर्गत समोर आलेल्या बनावट ॲप घोटाळ्याची व्याप्ती फार मोठी आहे. या घोटाळ्यासंदर्भात काँग्रेससह भाजपच्या कार्यकर्त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्याचे एसपी सोमनाथ घार्गे यांना निवेदन दिलं होतं. एस.पी. घार्गे यांनी या सर्व निवेदनाच्या प्रती ‘सायबर डिपार्टमेंट’कडे पाठवून सखोल चौकशी आणि तपास करण्याचे आदेश दिलेले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून या घोटाळ्याच्या संदर्भात ‘सायबर डिपार्टमेंट’ आणि अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक घार्गे यांच्याकडून कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. त्यामुळे या घोटाळ्यात कोणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

शनिशिंगणापूर देवस्थान बनावट ॲप घोटाळ्याच्या तपासाकडे संपूर्ण देशभरातल्या किंबहुना जगभरातल्या शनिभक्तांचे लक्ष लागलं आहे. शनिभक्तांनी मोठ्या विश्वासाने दिलेलं दान आणि त्यामध्ये जर कोणी घोटाळे करुन स्वतःच्या तुंबड्या भरत असतील तर हे कोणालाही सहन होणार नाही. या घोटाळ्याच्या बातमीने शनिभक्तांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या घोटाळ्यात कोणाकोणाचे हात बरबटलेले आहेत, या घोटाळ्याचा ‘मास्टरमाईंड’ कोण आहे, हा घोटाळा नक्की किती कोटींचा आहे, बनावट ॲप कोण कोण वापरत होतं, बनावट ॲप वापरण्यामध्ये नक्की कोण कोण सहभागी आहेत, हे आणि असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

संबंधितांच्या संपत्तीची चौकशी करा…!

शनिशिंगणापूर देवस्थान बनावट ॲप घोटाळ्याच्या संदर्भात अनेक चर्चांना सध्या चांगलंच उधाण आलं आहे. या चर्चांमध्ये एक चर्चा अशी ही आहे, की या देवस्थानमध्ये कार्यरत असलेला एक कर्मचारी आणि त्याने जमविलेल्या अमाप संपत्तीची चर्चा सध्या खुलेआम होताना दिसत आहे. या कर्मचाऱ्याने एक कोटी रुपयांची जागा खरेदी केली आणि त्या जागेवर दोन कोटी रुपये खर्च करून आलिशान बंगला बांधला, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील यांनी यापूर्वीच प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. हा कर्मचारी कोण, तो सध्या कुठल्या विभागात काम करतो आहे, तो मूळचा कुठला राहणारा आहे, शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये नोकरीस लागण्यापूर्वी त्याची संपत्ती किती होती आणि सध्याची त्याची मालमत्ता किती आहे, याची सखोल चौकशी करण्याची मागणी सध्या केली जात आहे. या कर्मचाऱ्यासह बनावट ॲप घोटाळ्यात ज्यांचे ज्यांचे हात अडकले आहेत, त्या सर्वांच्याच मालमत्तेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शनिभक्तांमधून केली जात आहे.

बंदी असलेल्या ॲपसंदर्भात देवस्थानची भूमिका काय?

श्री मंदिर ॲप, उत्सव ॲप, देवधाम ॲप, वामा ॲप या सर्व ॲप्स कंपन्यांना शनिशिंगणापूर देवस्थानने यापूर्वी परवानगी दिलेली असली तरी 22 मे 2025 रोजी या सर्व ॲप्स कंपन्यांना शनिशिंगणापूर देवस्थानने ऑनलाइन सेवा बंद करण्याचे पत्र दिले होते. मात्र यापैकी वामा ॲप या कंपनीने शनिशिंगणापूर देवस्थानच्या पत्राला केराची टोपली दाखवत जाहिरातीसाठी शनिदेवाच्या स्वयंभू शिळेचा फोटो वापरला असल्याची चर्चा आहे. या वामा ॲप कंपनी संदर्भात देवस्थानची भूमिका काय, याकडेही शनिभक्तांचे लक्ष लागलं आहे.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी