लोकपत न्यूज नेटवर्क / जळगाव / प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत महायुतीला जबरदस्त यश मिळाल्यामुळे विरोधकांच्या आमदारांची संख्या पन्नाशीच्या आतच राहिली आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेता कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मात्र अशातच महायुतीचे जेष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार यांना जबरदस्त धक्का बसणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. पवार यांनी मोठा विश्वास दाखवून ज्यांना उमेदवारी दिली, ते गुलाबराव देवकर
आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सामील होणार असून शरद पवारांची साथ सोडणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
गुलाबराव देवकर हे जळगावचे माजी पालकमंत्री असून शरद पवार यांच्या जवळचे नेते आहेत. देवकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली. दरम्यान या भेटीत काय चर्चा झाली हे समजलं नसलं तरी ते शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार
यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच शरद पवार गटाला हा मोठा राजकीय धक्का असल्याचे मानलं जात आहे. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार असल्याचे चित्र आहे. जळगावमध्ये गुलाबराव पाटील आणि गुलाबराव देवकर यांच्यात कांटे की टक्कर झाली होती. यामध्ये गुलाबराव पाटील
हे दुसऱ्यांदा जळगाव मधून प्रचंड मताधिक्याने विजयी झाले आहेत.