लोकपत न्यूज नेटवर्क / मुंबई / प्रतिनिधी
आठ वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळविण्याचा ज्यांनी पराक्रम केला, अशा श्याम बेनेगल यांनी मंथन हा चित्रपट तयार केला होता. विशेष म्हणजे त्यांच्या या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकनदेखील मिळालं होतं. मात्र या चित्रपटाची निर्मिती शेतकऱ्यांच्या पैशांमधून झाली असल्याचं फार थोड्या लोकांना माहीत आहे. या चित्रपटासाठी डबल पाच लाख शेतकऱ्यांनी दोन दोन रुपये दिले होते.
23 डिसेंबर रोजी श्याम बेनेगल यांचं वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालं. श्याम बेनेगल यांचा मंथन हा चित्रपट पाहण्यासाठी लोक गावागावातून ट्रकने प्रवास करत शहरात जाऊन चित्रपट पहायचे. स्मिता पाटील यांच्यापासून अमरीश पुरीपर्यंत अनेक दिग्गज अभिनेत्यांना श्याम बेनेगल यांनी चित्रपट सृष्टीत आणलं होतं.
2023 चा ‘मुजीब : द मेकिंग ऑफ अ नेशन’ हा श्याम बेनिगल यांचा शेवटचा चित्रपट होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या विनंतीवरून शाम बेनेगल यांनी हा चित्रपट तयार केला होता.