लोकपत न्यूज नेटवर्क / नवीदिल्ली / प्रतिनिधी
देशातल्या श्रीमंतांच्या संपत्तीमध्ये प्रचंड वाढ होत आहे. 8 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यायोग्य मालमत्ता असलेल्या हाय नेट वर्थ (HNI) लोकांची संख्या सध्या 8.5 लाखांपेक्षा जास्त आहे. आगामी 2017 पर्यंत यामध्ये दुपटीने वाढ होऊन ती संख्या 16.5 लाख होणार आहे. या लक्षाधिशांपैकी 20 % लोक चाळीस वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.
250 कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता असलेली अल्ट्रा हाय नेट वर्थ (UHNI) गेल्या वर्षीच्या तुलनेत 6% वाढून 13 हजार 600 च्या वर पोहोचली आहे. 2018 पर्यंत अशा लोकांची संख्या 50% पर्यंत वाढेल. मात्र अशा लोकांची जागतिक सरासरी फक्त 30 टक्के आहे.
UHNI च्या दृष्टीने भारतात जगात सहावा आणि आशियामध्ये तिसरा क्रमांक लागतो. आशे मध्ये आपण फक्त चीन आणि जपानच्या मागे आहोत. तरुण उद्योजक, तंत्रज्ञ आणि अनुभवी उद्योगपती यांचे मिश्रण हे यशाचं कारण आहे. बहुतेक श्रीमंत लोक देशात आणि परदेशात आलिशान मालमत्ता खरेदी करण्यात गुंतवणूक करत आहेत. देशात आलिशान घरांच्या विक्रीत 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे.