Saturday, May 17, 2025

श्रीमंत आणि प्रतिष्ठित नागरिकांनो, सावधान…! काही महिला तुमच्या सुखी संसाराची ‘वाट’ लावू पाहताहेत…! खोट्या प्रेमापासून सुरक्षित अंतर ठेवा…!

लोकपत डिजिटल मीडिया /  अहिल्यानगर

सुजान वाचकहो, सुरुवातीलाच तमाम महिला वर्गाची माफी मागून आम्ही (लोकपत डिजिटल मीडिया, अहिल्यानगर) ही बातमी देत आहोत.  समाजातल्या प्रतिष्ठित आणि श्रीमंत लोकांना शोधून त्यांच्याशी जवळीक वाढवायची, त्यांचा विश्वास संपादन करायचा, प्रेमाचं नाटक करायचं, या माध्यमातून चार दोन वेळा अशा लोकांशी ‘शरीरसंबंध’ही प्रस्थापित करायचे आणि त्यानंतर भारतीय दंड विधान कलम ३७६ या महिला अत्याचाराच्या कलमाची भिती दाखवून अशा श्रीमंत आणि प्रतिष्ठित लोकांना ‘ब्लॅकमेल’ करत त्यांच्याकडून पैसे उकळायचे, असा समाजातल्या सर्वच नाही, परंतू काही महिलांचा एककलमी कार्यक्रम आहे.

ज्या माणसाकडे प्रचंड पैसा आहे आणि जो माणूस सतत महिलांच्या ‘सहवासा’ची अपेक्षा करणारा आहे, अशा धनाढ्य माणसाला शोधून त्याच्यावर खोट्या खोट्या प्रेमाचं जाळं टाकायचं आणि त्या जाळ्यात एकदा का तो माणूस फसला, की त्याला आर्थिकदृष्ट्या खूप लुटायचं, अशा विशिष्ट विचारांच्या सर्वच नाही, परंतू काही महिलांचा एक कलमी कार्यक्रम असतो. भादंवि 376 या कलमाची भिती दाखवून संबंधित धनाढ्य माणसाला पोलीस तक्रारीची भीती दाखवायची आणि त्या माध्यमातून अमाप पैसा कमवायचा, असा धंदाच काही महिलांनी हाती घेतला आहे. विशेष म्हणजे अशा महिलांविरुध्द लेखी तक्रारीची पोलिसांना प्रतिक्षा आहे.

दरम्यान, संबंधितांनी लेखी तक्रार दिल्यास अशा महिलांचा बंदोबस्त करता येईल, अशी प्रतिक्रिया अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर खासगीत बोलताना व्यक्त केलीय. या पार्श्वभूमीवर समाजातल्या लोकांना या बातमीच्या माध्यमातून आम्हाला जाहीर आवाहन करावसं वाटतं, की श्रीमंत आणि प्रतिष्ठित नागरिकांनो, सावधान. सर्वच नाही, परंतू काही स्वार्थी महिला तुमच्या सुखी संसाराची ‘वाट’ लावू पाहताहेत. त्यामुळे खोट्या प्रेमापासून सुरक्षित अंतर ठेवा…!

‘ते’ लोक मुर्खांच्या नंदनवनातले…!

ही बातमी वाचल्यानंतर काही लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होऊ शकतो, की ही अशी बातमी देण्यामागे आमचा (लोकपत डिजिटल मीडिया, अहिल्यानगर) काही ‘वेगळा’ हेतू आहे. यासंदर्भात आमचं तर स्पष्ट मत आहे, की असा विचार जे करत असतील ते लोक मुर्खांच्या नंदनवनातले आहेत. समाज जागृती आणि ‘पब्लिक पर्पज’ या उद्देशाने आम्ही ही बातमी केली आहे. जर तुम्हाला अशा प्रकरणात अडकवले जात असेल तर खरंच तुम्ही स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा. त्या तक्रारीची एक प्रत आम्हाला द्या. संपूर्ण राज्यात आम्ही ती बातमी व्हायरल करु.

… तर तात्काळ पोलिसांत तक्रार द्या…!

खोट्या प्रेमाचं नाटक करत लोकांना आर्थिकदृष्ट्या फसविणाऱ्या सर्वच नाही परंतू काही स्वार्थी महिलांविषयी जर तुम्हाला माहिती मिळाली किंवा अशा दुष्टचक्रात तुम्ही अडकले असाल आणि तुम्हाला जर तुमच्या सुखी संसाराचं वाट्टोळं होऊ नये, असं वाटत असेल तर जरासादेखील वेळ वाया न घालवता अशा महिलांविरुध्द तात्काळ पोलिसांत तक्रार द्या.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी