Wednesday, January 22, 2025

संतोष देशमुख हत्या प्रकरणातला विष्णू चाटे जेरबंद ; ‘मास्टरमाईंड’ वाल्मिक कराड अद्यापही फिरतोय खुलेआम…!

बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यात असलेल्या मस्साजोग या ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये सहभागी असलेला विष्णू चाटे

याला  पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. मात्र या हत्याकांडातला ‘मास्टरमाईंड’ असलेला वाल्मिक कराड

अद्यापही उजळमाथ्याने खुलेआम फिरत आहे. या हत्याकांडात आतापर्यंत पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. 

विष्णू चाटेवर हत्या आणि खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. या हत्याकांडात कराड याच्यासह आणखी तीन आरोपी अद्यापही फरार आहेत. सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर विष्णू चाटे याची राष्ट्रवादी काँग्रेस मधून हकालपट्टी करण्यात आली होती.

संतोष देशमुख यांचे हत्येप्रकरणी सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, विष्णू चाटे, महेश केदार, कृष्णा आंधळे अशा सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मयत सरपंच संतोष देशमुख यांची नराधमांनी अतिशय निर्दयपणे हत्या केली आहे. लाईटरने त्यांचे डोळे जाळण्यात आले. त्यांच्या छातीवर उड्या मारण्यात आल्या. तीन तास त्यांना मारहाण करण्यात आली. माणसातलं क्रौर्य या हत्याकांडातून पुन्हा एकदा समोर आलं. या घटनेतल्या मास्टर माईंड वाल्मीक कराड याला अटक करण्याची मागणी बीडच्या ग्रामस्थांनी अद्यापही उचलून धरली आहे.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी