Monday, April 28, 2025

सन्माननिधी योजनेअंतर्गत सेवानिवृत्त चालकांना मिळणार प्रत्येकी दहा हजार रुपये…! राज्य शासनाने केली 15 हजार कोटी रुपयांची तरतूद…!

लोकपत न्यूज नेटवर्क

मंत्रालय प्रतिनिधी / मुंबई 

धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळा’च्या ‘निवृत्त सन्मान योजने’तर्गत प्रातिनिधिक स्वरुपात ५ चालकांना १० हजार रुपयांच्या सन्माननिधीचे वितरण करण्यात आले. महामंडळामध्ये नोंदणी असलेल्या १ हजार ६०० चालकांना हा निधी देण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाने १५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

राज्यात स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र (एटीएस), स्वयंचलित चालक चाचणी केंद्र (एडीटीटी), एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (आयटीएम) यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चालकांना अद्ययावत करणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

म्हणाले. रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आरटीओने नागरिकांचे प्रबोधन आणि शिक्षण करण्याचं आव्हान परिवहन विभागाने स्विकारलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते परिवहन भवनाचं भूमिपूजन झालं. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. राज्यातले २४ चेक पॉईंट (Checkpoints) १५ एप्रिलपर्यंत बंद करण्याचे निर्देश परिवहन विभागाला (Transport Department) दिले आहेत.

रविवारी परिवहन भवनाच्या (Parivahan Bhavan) भूमिपूजन कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. देशभरात जीएसटी (GST) लागू झाल्यामुळे सीमा तपासणी नाक्यांचे महत्त्व कमी झाले आहे, असंही ते म्हणाले.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी