Wednesday, January 22, 2025

सफाई कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार : कामगार आयुक्त भिसले यांची ग्वाही…!

लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर

अहिल्यानगर जिल्ह्यातल्या नगरपरिषदांमध्ये काम करत असलेल्या सफाई कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन अदा करण्यात येत नसल्याच्या तक्रारी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस या अराजकीय संस्थेकडे आल्या होत्या. तक्रार संदर्भात ऋषिकेश गोहेर आणि अन्य कामगारांनी अहिल्यानगरचे कामगार आयुक्त भिसले

यांची भेट घेतली. सफाई कामगारांच्या प्रश्नांसंदर्भातल्या भेटीत सकारात्मक चर्चा झाली.

या संदर्भात आयुक्त भिसले यांनी सांगितलं, की ‘अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहता, श्रीरामपूर आणि देवळाली प्रवरा इथल्या सफाई कामगारांना ठेकेदाराकडून किमान वेतन कायद्यानुसार ठेकेदार पगार देण्यात येत नाहीत, अशा तक्रारी करण्यात आल्या आहेत. या तक्रारींची आम्ही गंभीरपणे दखल घेत आहोत. सफाई कामगारांच्या कागदपत्रांची पूर्तता करून कायदेशीर प्रक्रियेद्वारे सफाई कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न केले जाते’. यावेळी महिला आणि पुरुष सफाई कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी