भाजपचे नेते आणि कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांची पहिल्यांदाच महायुतीच्या मंत्रीमंडळात वर्णी लावण्यात आली आहे. राणे यांच्याकडे मत्स्य आणि बंदर खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या पदाचा पदभार स्वीकारताना माध्यमांशी बोलताना मंत्री राणे यांनी सागरी किनाऱ्यावर राहणाऱ्या बांगलादेशांचा बंदोबस्त करण्याचा निर्धार केला असल्यास बोलून दाखवलं.
मंत्री राहणे म्हणाले, ‘सागरी किनाऱ्याची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. या परिसरात रोहिंगे आणि बांगलादेशी वास्तव्य कदापिही सहन केलं जाणार नाही. मत्स्य आणि बंदर या दोन्ही खात्यांमध्ये नक्की काय सुरू आहे, कुठून सुरुवात करायची, याचा आढावा मी घेतला आहे. विकासाच्या अनुषंगाने काय करता येईल, यासाठी सूचना या विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
26 / 11 च्या हल्ल्यानंतर आपण फार मोठी खबरदारी घेतली आहे. मात्र जिहादी लोकांच्या ‘ॲक्टिव्हिटी’ अद्यापही सुरू आहेत. त्यामुळे त्यासाठी काय करता येईल, याचा विचार आम्ही करत आहोत. बांगलादेशीचं वास्तव आम्ही सहन करणार नाही. त्यांच्या सफाईची मोहीम आम्ही लवकरच हाती घेणार आहोत’.