लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरण आणि त्या धरणासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या, त्या धरणग्रस्तांचा प्रश्न 1970 – 71 पासून धगधगत आहे. या जिल्ह्यातल्या धरणग्रस्तांवर ‘सरकारी बाबूं’कडून सातत्यानं अन्याय झाला आहे. वरिष्ठांना चुकीचे अहवाल पाठवून धरणग्रस्तांना प्रचंड मनस्ताप देणारे या मंडळींना आमचा जाहीर सल्ला आहे, की ‘सरकारी बाबूं’नो, लाजा वाटू द्या जरा. धरणग्रस्तांना न्याय देऊ शकत नसाल तर खुर्च्या खाली करा.
जायकवाडी धरणात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, त्या धरणग्रस्तांपैकी दिगंबर आवारे यांच्या व्यथा ‘लोकपत’ डिजिटल मीडियानं जाणून घेतल्या. यावेळी आवारे यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले. ‘सरकारी बाबूं’नी त्यांना दिलेला मनस्ताप आणि केवळ कागदी घोडे नाचवण्याचा केलेला प्रकार हे समजून घेतल्यानंतर तुमच्या मनात नक्कीच संतापाची लाट उसळल्याशिवाय राहणार नाही.
‘सामान्य माणसाचं सरकार’ अशी सभेला उपस्थित असणाऱ्या भोळ्या भाबड्या लोकांच्या टाळ्या मिळविण्यासाठी केलेली भाषणं आणि प्रत्यक्षात सामान्य माणसावर सरकारी यंत्रणांकडून होत असलेला अन्याय हे जर पाहिलं तर तर या सरकारचे खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे दात आहेत, याची प्रचिती तुम्हा सर्वांना नक्कीच येईल. अधिकचा वेळ न घालवता दिगंबर आवारे या धरणग्रस्त शेतकऱ्याची ही व्यथा तुम्ही नक्की सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐका.