लोकपत न्यूज नेटवर्क / बीड / प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यात असलेल्या मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची दोन – तीन दिवसांपूर्वी अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणी केज पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आलाय, ती नावं दिग्गज लोकांची आहेत.
सरपंच देशमुख यांच्या हत्येमागे खंडणी हेच कारण असल्याचं अखेर समोर आलं आहे. तुम्हीच प्रत्यक्ष पहा, लोकशाही न्यूज चॅनलची ही स्पेशल न्यूज…!
नराधमांनी अशा पद्धतीनं केला संतोष देशमुख यांचा खून…!
हे नराधम सरपंच देशमुख
यांना तीन तास ‘टॉर्चर’ करत होते. सरपंच देशमुख यांचे डोळे लायटरने जाळण्यात आले. डोळे बाहेर काढण्यात आले. छातीवर दोघांनी उड्या मारुन छाती मोडली. अंगावर केबलने मारहाण केली. गुप्तांगास जाळण्यात आलं. असे भयंकर त्रास देऊन त्यांचे अतोनात हाल हाल करून त्यांचा खून केला.