बाळासाहेब शेटे पाटील
लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
सन २०१८ ते २०२३ च्या कालखंडात या नगर शहरांमध्ये मोठ मोठे होर्डिंग लागल्याचं तुम्ही पाहिलं असेल. या मोठ मोठ्या होर्डिंग्जवर फायनान्स कंपन्यांच्या जाहिरातीही तुम्ही पाहिल्याच असतील. त्या जाहिराती पाहून तुमच्यापैकी अनेकांनी याच्या निधी / फायनान्स कंपन्यांमध्ये आर्थिक गुंतवणूकही केली असेल. नगर तालुक्यातल्या रांजणी माथणी या छोट्याशा गावातल्या संदीप थोरात या धूर्त आणि बोल घेवड्या इसमाने सामान्य लोकांना विश्वासात घेऊन त्यांचा अक्षरश: केसानं गळा कापलाय. ‘दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए’, हे या थोरातने अगदी तंतोतंत खरं करुन दाखवलं आहे. ‘अपेक्षांच्या पलीकडचं’ ही टॅगलाईन घेऊन हा थोरात निघाला होता. शहर तसेच जिल्ह्यातल्या लोकांची दिशाभूल करुन त्यानं हा ‘उद्योग’ केलाय.
आता तुम्ही विचाराल, मग या संदीप थोरातविरुद्ध आतापर्यंत पोलिसांत गुन्हा का दाखल झाला नाही? उत्तर स्पष्ट आहे, याला थोडीशी ही कुणकुण लागली, की आपल्याविरुद्ध कोणी तरी पोलिसांत तक्रार देण्याच्या मनस्थितीत आहे. तर तो लगेच त्या व्यक्तीला गोड गोड बोलून बरोब्बर ‘मॅनेज’ करत होता.
या थोरातची बऱ्यापैकी राजकीय मंडळींसह गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी ओळख होती. आता या थोरातच्या करामती ध्यानपूर्वक वाचा. या थोरातने तब्बल २९ निधी कंपन्या स्थापन करण्याचा पराक्रम केलाय. सुरुवातीला पाणी विक्री करणारी एक्वा आणि मिल्क प्रोडक्ट कंपनी स्थापन केली. नंतर भिशीवाला चीट फंड प्रायव्हेट कंपनी स्थापन केली. त्यात आर्थिक घोटाळा केल्यानंतर एक निधी लिमिटेड कंपनी स्थापन केली.
अहो, या चाणाक्ष थोरातने बायकोला पुढे करत ब्युटी पार्लरची कंपनी स्थापन केलीय. या कंपनीचे स्वतःसह पत्नी आणि दोन नवीन संचालक तयार केले. ही कंपनी सहकारी तत्त्वावर सुरु केल्याचं त्यानं लोकांना खोटंच सांगितलं.
या धूर्त, चाणाक्ष, लबाड आणि ‘याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात’ असले उल्टेपाल्टे (खरं तर पालथे उद्योग) करणाऱ्या या थोरातच्या पालथ्या उद्योगांची कुंडली खूप मोठी आहे. यथावकाश आणि टप्प्याटप्प्याने ती आपण जाणून घेणार आहोत.