लोकपत न्यूज नेटवर्क / नवीदिल्ली
काय? तुम्ही पंधरा वर्षांपूर्वीची दुचाकी किंवा चार चाकी वापरत आहात? तर मग ही बातमी नक्की तुमच्यासाठीच आहे. पंधरा वर्षांपूर्वी आरटीओ पासिंग केलेल्या दुचाकी ठाणे चार चाकीच्या रि-पासिंग संदर्भात केंद्र सरकारने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तो निर्णय काय आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ही बातमी सविस्तर वाचावी लागणार आहे.
केंद्र सरकारच्या परिवहन आणि रस्ते वाहतूक विभागानं एक महत्त्वाचं परिपत्रक (जीआर) काढलं आहे. दुचाकी आणि चार चाकी वाहनांच्या पुनर्नोंदणी शुल्क संदर्भात केंद्र सरकारचा हा निर्णय आहे. या निर्णयानुसार वाहनांच्या पुनर्नोंदणी शुल्कात वाढ करण्यात आली आहे. या जीआरनुसार पंधरा वर्षांपूर्वीच्या वाहनांच्या पुनर्नोंदणीसाठी बारा ते अठरा हजार रुपयांपर्यंतचं शुल्क भरावे लागणार आहे.
यापूर्वी वाहनांच्या पुनर्नोंदणी शुल्कासाठी 8 हजार रुपये द्यावे लागत होते. मात्र, आता यात वाढ झाली असून 12 ते 18 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. यामुळे वाहनधारकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. सरकारने, वाहनांच्या पुनर्नोंदणी शुल्क वाढीच्या या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी वाहतूक संघटनांकडून केली जात आहे.
यासाठी आधी तुम्हाला नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) कडून वाहन चोरीला गेले नाही याची पुष्टी करून घ्यावी लागते आणि मोटार वाहनावर कर्ज असल्यास फॉर्म 35 मध्ये वित्तपुरवठा करणाऱ्याकडून नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेणे आवश्यक आहे. दुसऱ्या राज्यात पुन्हा नोंदणी झाल्यास आरटीओकडून एनओसी मिळविण्यासाठी, फॉर्म 27 आणि 28 आरटीओकडे जमा करावा लागेल.
अर्जाव्यतिरिक्त विम्याची प्रत, मूळ आरसी, पीयूसी प्रमाणपत्र आणि वाहनाचे मूळ चलन यासारखी कागदपत्रे सादर करावी लागतात. तसेच, ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा आणि आपल्या स्वाक्षरीचे ओळखपत्रही सादर करावे लागते.
एकदा तुम्ही कागदपत्रे जमा केल्यानंतर आणि नोंदणी प्राधिकरणाकडून त्याची पडताळणी झाल्यानंतर, तुम्हाला पुढे अर्ज शुल्क तसेच रस्ता कर भरावा लागेल. भविष्यातील काही समस्यांकरिता रस्ता कर पावती आणि शुल्काची पावती सुरक्षितपणे ठेवावी. तुम्ही तुमच्या वाहनाची दुसऱ्या राज्यात पुनर्नोंदणी केली असेल, तर तुम्ही पूर्वीच्या RTO येथे कर परतावासाठी अर्ज करू शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली, यासाठी आमच्या 70 28 35 17 47 या व्हाट्सअप मोबाईल क्रमांकावर तुमची प्रतिक्रिया पाठवा.