लोकपत न्यूज नेटवर्क / मुंबई
हल्ली प्रत्येकाच्या घरात फ्रीज असतं. उन्हाळ्याची चाहूल आता सर्वत्र लागत आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्येच तापमान वाढायला लागला असल्यामुळे या वर्षीचा उन्हाळा कडक असणार याची प्रचिती यायला लागली आहे. अशा परिस्थितीत घरातल्या फ्रीजमध्ये स्फोट होणार नाही, याची काळजी आपल्या सर्वांना घ्यावी लागणार आहे. फ्रिजमध्ये स्फोट का होतो आणि तो टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, यासाठी ही बातमी काळजीपूर्वक वाचा.
अनेकांच्या फ्रिजमध्ये फ्रिजरचे आणि फ्रिजचे वेगवेगळे सेटिंग असते. अनेकांना आपला फ्रिज कोणत्या नंबरवर ठेवावा हे माहिती नसते. उन्हाळ्यात, हिवाळ्यासाठी आणि पावसाळ्यासाठी वेगवेगळे तापमान असते. उन्हाळ्यात खाद्यपदार्थ लवकर खराब होतात, यामुळे उकाड्याची झळ त्यांच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून फ्रिजचा कॉम्प्रेसर सतत काम करत असतो. तापमान वाढवून ठेवले तर कॉम्प्रेसरला सतत काम करावे लागते. यामुळे स्फोट होऊ शकतो.
उन्हाळ्यात फ्रिज ३ ते ४ नंबरवर ठेवावा. जेणेकरून खूप जास्त थंड नाही, खूप कमी थंड नाही असे वातावरण तयार राहते. थंडीमध्ये फ्रिजचे सेटिंग १ नंबरवर ठेवावे. थंडीच्या काळात अनेकजण फ्रिज बंद मध्ये मध्ये करून ठेवतात. जे चुकीचे आहे. तसेच बराच काळ फ्रिज बंद केला तर त्याचा कॉम्प्रेसर जाम होऊ शकतो आणि चालू करताच तापून बिघडू शकतो.
फ्रीजची दुरुस्ती करताना अनेकदा पैसे वाचतात म्हणून किंवा दुरुस्त करणारा लोकल पार्ट वापरतो. यामुळे स्फोट होऊ शकतो. कॉम्प्रेसरची कंपनीच्या माणसाकडूनच दुरुस्ती करून घ्यावी आणि ओरिजिनल पार्ट वापरावेत. यामुळे फ्रिजच्या नादुरुस्तीकडे दुर्लक्ष करू नका.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लोकपत न्यूज नेटवर्क यावर तुम्हाला बातम्या वाचायला आणि त्या बातम्यांची व्हिडिओदेखील पाहायला मिळतील. याबरोबरच तुमच्यासाठी लोकपच यूट्यूब चॅनलदेखील उपलब्ध आहे. या तुमच्या लोकपत यूट्यूब चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. ज्यामुळे आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी तुमच्या मोबाईलवर येतील, धन्यवाद.