Sunday, June 15, 2025

सैफ अली खानचं घर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करा…! राजगुरुनगरच्या सुधीर शेळके यांची उपरोधिक मागणी…! वृत्तवाहिन्यांची शेळके यांनी उडवली खिल्ली…!

लोकपत न्यूज नेटवर्क / पुणे 

अभिनेता सैफ अली खानवर कथित बांगलादेशी इसमाकडून झालेला चाकू हल्ला आणि त्या हल्ल्याचं खासगी वृत्तवाहिन्यांनी केलेलं प्रसारण हा मोठा टिकेचा विषय बनला आहे. खासगी रुतवाहिन्यांनी या संदर्भात दिलेल्या बातम्यांची आणि या बातम्या देणाऱ्या खाजगी वृत्तवाहिन्यांची पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर इथं राहणाऱ्या सुधीर शेळके यांनी चांगलीच खिल्ली उडवली आहे. अभिनेता सैफ अली खानचं घर, बेडरुम हे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात यावं, अशी उपरोधिक मागणी शेळके यांनी केली आहे.

एका वर्तमानपत्रात ही बातमी आली असून या बातमीमध्ये शेळके यांनी म्हटलं आहे, की एक अभिनेता म्हणून सैफ अली खान आम्हाला माहीत होता. मात्र तो त्याहीपेक्षा खूप महान असल्याचा साक्षात्कार आम्हाला बातम्यांमधून झाला. सैफ अली खान याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला, तो चाकू संग्रहालयात ठेवावा, अशी उपरोधिक मागणीदेखील शेळके यांनी केली आहे. नक्की काय आहे, शेळके यांची मागणी हे तुम्हीच प्रत्यक्ष वाचा आणि विचार करा. 

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी