लोकपत न्यूज नेटवर्क / नवीदिल्ली / प्रतिनिधी
सोन्या चांदीच्या दरांत काल अर्थात दि. ६ डिसेंबर रोजी मोठी घट झाल्याचे पाहायला मिळालं. 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा 301 रुपयांनी घसरून 76 हजार 152 रुपयांवर आला. तर चांदी 213 रुपयांनी घसरून 90 हजार 997 रुपये प्रति किलो झाली.
चांदीचा भाव यापूर्वी 91,210 रुपये होता. तर सोन्याचा भाव यापूर्वी 76 हजार 453 रुपये होता. 23 ऑक्टोबर रोजी चांदीने 99 हजार 151 तर 30 ऑक्टोबर रोजी सोन्याने 79 हजार 681 रुपयांचा उच्चांक गाठला होता. दरम्यान, जून पर्यंत सोनं 85 हजार रुपये पर्यंत जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अमेरिकेनंतर ब्रिटनने व्याजदरांत कपात केल्यामुळे गोड एटीएफची खरेदी वाढली. सोन्यामध्ये मोठी तेजी आल्यावर घसरण होणार होती. मात्र ती आधीच झाली, असल्याचं केडिया ॲडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांनी सांगितलंय.