लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
नेवासे तालुक्यातल्या सोनईचा आठवडे बाजार कुठं आणि कशा अवस्थेत भरतोय, त्याठिकाणी किती गैरसोय आहे, किती दुर्गंधी आहे, काटेरी झुडपे आणि दुर्गंधीचा व्यावसायिक, व्यापारी आणि ग्राहकांना त्याठिकाणी किती मनस्ताप सहन करावा लागतो आहे, याचा विचार सोनई ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामसेवक गंभीरपणे विचार करतील का, हाच खरा प्रश्न आहे.
सोनईचा आठवडे बाजार दर रविवारी भरतो. बेशिस्तपणा, संबंधितांचं याकडे होत असलेलं अक्षम्य दुर्लक्ष यामुळे हा बाजार चक्क सोनई – कांगोणी रस्त्यावर भरतो आहे. या परिसरातल्या काटेरी झुडपांमुळे भाजी विक्रेते याठिकाणी बसू शकत नाहीत. त्यामुळे अनेक भाजी विक्रेते सोनई – कांगोणी रस्त्याच्या कडेलाच बसतात. याचा परिणाम वाहतूक कोंडीवर होतो. सोनई पोलिसांचं याकडे दुर्लक्ष होत आहे. या परिसराचं विदारक वास्तव आता प्रत्यक्षात तुम्हीच पहा…!