Monday, April 28, 2025

सोनईचा ‘तो’ भामटा आणि त्याचा ‘हा’ भामटेपणा…!

लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर

‘खोटं बोल पण रेटून बोल’ अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. नेवासे सोनईतला एका भामट्याला ही म्हण चपखलपणे लागू पडते. कारण या भामट्याने सोनईच्या व्यापारी वर्गातल्या अनेकांना या म्हणीप्रमाणे खोटं बोलून फसवलं आहे. परंतू हा भामटा मोठ्या नेत्याशी जवळीक दाखवत असल्यानं तक्रार करायला कोणीही समोर येत नाही. असं असलं तरी नेवासा तालुक्याऐवजी बाहेरची अनेक मंडळी या भामट्याविरुद्ध पुरावे घेऊन आमच्याकडे (लोकपत न्यूज नेटवर्क) येत आहेत.

सोनईच्या या भामट्याने जो भामटेपणा केला आहे, त्याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने आमचा हा लेखन प्रपंच आहे. मोकळ्या जागा आणि जमिनी खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असलेला हा भामटा कमी कष्टात भरपूर पैसा कमविण्याच्या नादात सध्या भलताच हवेत आहे. यामुळे अनेक मित्रांपासून तो दुरावला आहे.

सोनईच्या ‘या’ भामट्याने छत्रपती संभाजीनगरच्या बाबा पेट्रोल पंपाजवळ असलेल्या तब्बल दीड हजार कोटींची स्थावर मालमत्ता बळकविण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख आम्ही यापूर्वीच्या आमच्या बातमीमध्ये केलेला आहे. सोनईचा ‘तो’ भामटा कोण, हे सोनईकरांना चांगल्यापैकी माहित आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल जास्त काही लिहावं, अशी आमची मुळीच इच्छा नाही. या भामट्यानं चक्क लष्कराच्या जमिनीचा संबंधित ‘पट्टेदारा’ला हाताशी धरुन जो सौदा केला आहे, त्या सौद्यात सोनईच्या भामट्याने अनेकांच्या डोळ्यांत मातीऐवजी मिरचीची भुकटी फेकली आहे. आता हे कसं झालं, याविषयी यानंतरच्या बातमीत सविस्तर वाचा.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी