लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर
नेवासे तालुक्यातल्या सोनईचा एक भिशीचालक ‘नाजूक’ प्रकरणात अडकल्याची प्रचंड चर्चा ऐकायला मिळत आहे. अहिल्यानगरच्या एका महिलेशी या भिशीचालकाचे अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर त्या महिलेने या भिशी चालकाला ‘ब्लॅकमेल’ करण्याचा प्रयत्न केला. ‘नाजूक’ प्रकरणात अडकलेल्या या भिशीचालकाने हे ‘लफडं’ तब्बल ६० लाख रुपये देऊन मिटविण्याचा प्रयत्न केल्याची चर्चादेखील सोनई परिसरात रंगली आहे. दरम्यान, संबंधित महिलेकडून या भिशीचालकाला आणखी पैशांची मागणी केली जात असल्याचं विश्वसनीय सूत्रांमार्फत समजतंय.
असं म्हणतात, की माणसाकडे अमाप पैसा आला, की त्या माणसाचे पाय आपोआप वाममार्गाकडे वळतात. कमी वेळेत आणि कमी कष्टांत आलेला पैसा माणसाला आपोआपच ‘बाई’ आणि ‘बाटली’कडे घेऊन जातो. सोनईतल्या या भिशी चालकाचंदेखील असंच झालंय. सोनई-राहुरी रस्त्यालगतच्या प्रशस्त व्यावसायिक गाळ्यांमध्ये सरकारमान्य भिशी चालते. सोनईलगतच्या बेल्हेकरवाडी या छोट्याशा गावातून आलेल्या या तरुण भिशीचालकाला संबंधित महिलेच्या तथाकथित सौंदर्याची भुरळ पडली आणि तो भिशीचालक त्या महिलेच्या खोट्या प्रेमाला बळी पडला.
या भिशीचालकाच्या संबंधित ‘लफड्या’ची नुसतीच चर्चा रंगली असली तरी हा भिशी चालक कोण, अहिल्यानगरची ती महिला कोण, संबंधित भिशीचालकाने त्या महिलेला साठ लाख रुपये कसे दिले, फोन पेवरुन दिले की गुगल पेवरुन दिले, त्या महिलेच्या बँक अकाउंटला टाकले की संबंधित महिलेला साठ लाख रुपयांची रोख रक्कम दिली, हे सारे प्रश्न सध्या तरी अनुत्तरीतच आहेत.
अमाप पैसे कमविण्याचा धंदा…!
ज्या माणसाकडे प्रचंड पैसा आहे आणि जो माणूस ‘नादीक’ आहे अर्थात सतत महिलांच्या सहवासाची अपेक्षा करणारा आहे, अशा अल्पावधीत धनाढ्य झालेल्या माणसाला शोधून त्याच्यावर खोट्या खोट्या प्रेमाचं जाळं टाकायचं आणि त्या जाळ्यात एकदा का तो माणूस फसला, की त्याला आर्थिकदृष्ट्या खूप लुटायचं, असा या विशिष्ट विचाराच्या महिलांचा एक कलमी कार्यक्रम असतो. भादंवि 376 या कलमाची भिती दाखवून संबंधित धनाढ्य माणसाला पोलीस तक्रारीची भीती दाखवायची आणि त्या माध्यमातून अमाप पैसा कमवायचा, असा धंदाच काही महिलांनी हाती घेतला आहे.
दरम्यान, संबंधित भिशीचालकाने पोलिसांकडे तक्रार दिल्यास अशा महिलांचा बंदोबस्त करता येईल, अशी प्रतिक्रिया सोनई पोलीस ठाण्याच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने खासगीत बोलताना व्यक्त केलीय.