लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
सोनईच्या भामट्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये जी जमीन विकत घेतली आहे, ती जमीन छत्रपती संभाजीनगरच्या मालजीपूरा परिसरातली सर्वे नंबर ९/१ ही हैदराबादच्या सालारजंग इस्टेटची आहे. या जमिनीचा व्यवहार या भामट्याने सालारजंगच्या पट्टेदाराला हाताशी धरुन केला आहे. परंतू जे तेलंगणा हायकोर्ट आहे, त्या कोर्ट डिक्रीनुसार या पट्टेदाराला असा व्यवहार करण्याचा असा कोणताही अधिकार नाही, ही गंभीर परंतू महत्त्वपूर्ण बाब कोणाच्याही लक्षात आलेली नाही.
यामध्ये धक्कादायक प्रकार असा आहे, की सोनईचा भामटा छत्रपती संभाजीनगरच्या मालजीपूरा परिसरातली सर्वे नंबर ९/१ या जमिनीऐवजी लष्करी विभागाच्या ताब्यात असलेली रस्त्यालगतची करोडो रुपये किंमतीची जमीन काही लोकांना दाखवून त्यांच्यासोबत आर्थिक गुंतवणूक करण्याचे मनसुबे रचत आहे. हा व्यवहार होणं अशक्य असलं तरी लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याऐवजी मिरचीची भुकटी फेकण्याचं पाप हा भामटा करत असून या भामट्यासोबत व्यवहार करत असलेल्या लोकांनी आताच खडबडून जागं होण्याची आवश्यकता आहे.
या भामट्याने नेवासे तालुक्यात १६५ एकर जमीन घेतली आहे. अर्थात ही सर्व जमीन या भामट्याने नातेवाईक, मित्र, मित्रांचे मित्र अशा लोकांच्या नावे घेतली आहे. विशेष म्हणजे या भामट्याने पुण्यात जमीन खरेदी आणि विक्रीचे प्रचंड उलटसुलट व्यवहार (लिटीकेशन) केल्याचं बोललं जात आहे. या व्यवहाराचे पुरावे आणि तक्रारदारांच्या मुलाखती (बाईट्स) लवकरच आम्ही (लोकपत न्यूज नेटवर्क) प्रसारित करत आहोत.