लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर / प्रतिनिधी
नेवासे तालुक्यातल्या सोनई इथल्या तिरुपती कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या गाळ्याच्या गैरव्यवहारात राजेंद्र गुगळे आणि अमोल शिंदे या दोघांनी आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी सोनईचे सराफ व्यावसायिक महेश सोमनाथ कडेल (रा. शेटे पाटील गल्ली, सोनई तालुका – नेवासा जिल्हा – अहिल्यानगर, महाराष्ट्र, मोबाईल नंबर 98 60 38 86 54)
यांनी केली आहे. यासंदर्भात कडेल यांनी अहिल्यानगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात एक निवेदन दिलं आहे.
या निवेदनात म्हटलं आहे, की मी नेवासे तालुक्यातल्या सोनईच्या बाजारपेठेत गेल्या 22 वर्षांपासून सराफ व्यवसाय करत आहे. दरम्यानच्या काळात माझा पूर्वाश्रमीचा मित्र राजेंद्र तखतमल गुगळे याने सोनईतल्या तिरुपती कॉम्प्लेक्स या बेकायदेशीर इमारतीतल्या गाळे खरेदीत माझी तब्बल सुमारे 44 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
तिरुपती कॉम्प्लेक्स या बेकायदेशीर इमारतीतला बेसमेंटचा गाळा राजेंद्र गुगळे याने माझ्या अक्षरशः गळ्यात मारला. या व्यवहारात गुगळे याने माझ्यासह अनेक व्यावसायिक, व्यापारी, शिक्षक शेतकऱ्यांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केलेली आहे.
विशेष म्हणजे गुगळे याला दहा लाख रुपयांची रक्कम मी बँकेत सोनेतारण कर्ज करून दिलेली आहे. या दहा लाख रुपयांचं 1 लाख 75 हजार रुपये व्याज मी भरलं आहे. गुगळे याने मला जो गाळा दिला, तो बेसमेंटला असून थोड्याशा पावसानंदेखील त्या गाळ्यामध्ये प्रचंड पाणी साचतं.
या गाळ्याच्या व्यवहारासाठी गुगळे यांच्यामार्फत अमोल शिंदे माझ्याकडे आला होता. हा गाळा तू विकत घेतल्यास तुझा चांगला आर्थिक फायदा होईल, असं आमिष मला त्यानं दाखवलं.
काही दिवसांपूर्वी या गाळ्यांमध्ये मी ठेवलेल्या इलेक्ट्रिक काटा, साउंड सिस्टिम आणि फर्निचर अशा सर्व महागड्या वस्तूंचं प्रचंड नुकसान नुकसान मला सहन करावं लागलं आहे. दहा लाख रुपये रोख रक्कम आणि त्यावरील व्याज अशी तब्बल 44 लाख रुपयांची माझी आर्थिक हानी झालेली आहे. या संदर्भात गुगळे याला मी सातत्याने माझे जे आर्थिक नुकसान झाले आहे, त्यातून मला वाचव. मला माझी दहा लाख रुपये रक्कम परत दे, अशी समक्ष भेटून फोनद्वारे विनंती केली. मात्र गुगळे याने सातत्याने माझा अपमान केला.
आमच्याकडे पैसे गुंतवायला आम्ही तुझ्या दारात आलो होतो का, असा प्रति प्रश्न त्याने मला अनेकवेळा केला. सध्या माझ्यासमोर माझ्या मुलांचं करिअर, लग्न आणि सांसारिक अडचणी आहेत. यामुळे माझं मानसिक संतुलन ढासळत चालल आहे. माझी कौटुंबिक परिस्थिती खूपच अडचणीची होत आहे. त्यामुळे मला गुगळे याने माझी मुद्दल व्याजासह 44 लाख रुपये द्यावी. अन्यथा मी येत्या आठ दिवसानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे. त्यानंतर जे काही परिणाम होतील, त्याला पोलीस यंत्रणा जबाबदार राहील.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सोनई पोलीस ठाणे सोनई, संपादक लोकपत न्यूज नेटवर्क अहिल्यानगर महाराष्ट्र, संपादक, सर्व वृत्तपत्र आणि पादक सोशल मीडिया, अहिल्यानगर, महाराष्ट्र यांना देण्यात आल्या आहेत.